विश्वचषक आपलाच आहे
खेळाडू एकापेक्षा एक आहेत
विराट, रोहित,शामी, जडेजा, श्रेयस
भारताचे हुकमी एक्के आहेत
विश्वचषक आपलाच आहे
संपूर्ण स्पर्धा मालिकेत
एकदा पण हरलो नाही
हेच आपले वैशिष्टे आहेत
विश्वचषक आपलाच आहे
ऑस्ट्रेलिया हा संघ फार चतुर आहे
हलक्यात मुळीच घेऊ नका कारण
संधीचे सोने करण्यात माहीर आहे
विश्वचषक आपलाच आहे
माघार घेऊ नका
2003 चा बदला
घेतल्याशिवाय राहू नका
विश्वचषक आपलाच आहे
धुवाधार फलंदाजी करा
आणि उत्तम गोलंदाजी करा
अहमदाबाद मैदान सर करा
विश्वचषक आपलाच आहे
शर्यत अजुन संपली नाही
एक डाव बाकी आहे
मुळीच आता हरायचे नाही
विश्वचषक आपलाच आहे
सामना बघायला रंगत येणार आहे
रविवार खास सुट्टीचा दिवस
क्रिकेट प्रेमींचा सरविकडे जल्लोष असणार आहे
विश्वचषक आपलाच आहे
ही काळया दगडावरची रेघ आहे
भारतीय संघ तिसरी बाजी मारणार
यात काही शंका नाही आहे
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
मु.पो. शिरखळ,गाव.हातीप(तेलवाडी)
ता.दापोली,जि.रत्नागिरी (मुंबई,विरार)