मीच मिटवलेला विलक्षण क्षण
छाप जखमांची सोडून गेला
कुरवाळत जुन्या आठवणी
घाव कायमचा देऊन गेला || धृ. ||
वेदना हर्षित काळजावरल्या
रोज नव्याने या चिरत गेल्या
प्रत्येक श्वासासोबत माझ्या
पेटतो वणवा आतला || १ ||
मनाची घालमेल साठवत
कितीदा मिठीत बघ घेतल्या
अश्रूंचा संसार तोचि माझ्या
वेदना प्रत्येक क्षणाला || २ ||
बोलणे इतके कठीण झाले
भावना क्षीण होऊन गेल्या
गीत हृदयातले कळले नाही
थकलेल्या दुःखी मनाला || ३ ||
इच्छा सगळ्या झपाटलेल्या
कुणास ठाऊक ताज्या झाल्या
रंगीन सोहळा थाटून परसदारी
नवा ध्यास या जीवनाला || ४ ||
© कु. वर्षा शिदोरे, नाशिक