श्वास श्वासात गुंफिले मराठी कविता Marathi Kavita, Poem

सोनाली रामलाल रसाळ लिखित मराठी कविता प्रेम कसं असावं याचे ज्वलंत उदाहरण श्वास श्वासात गुंफिले

श्वास श्वासात गुंफिले मराठी कविता Marathi Kavita, Poem

ओसरले भास सारे देह हा पाझरला
अर्पूनी प्रेम सारे विश्वास हा विखुरला

नाही भेट होणे कधी आस तू सोडून दे
पापण्यांच्या आंतरी पूर आसवांचे वाहून दे

दीर्घ श्वास सोडूनी मी हुंदका मनात घेतला
विरहाच्या तुझ्या यातना ऐकाकी पने सोसल्या

जीवन हे एकदाच रे जगून घे मनमोकळे
शरीरे जरी भिन्न आपले आत्मा नव्हे वेगळे

मनमुराद स्वच्छंदी वारे वाहू दे शब्दांचे
शब्द शब्द जोडुनी कवितेला घातले मी साकडे

नाही उणीव कधी भासली सोबती तू नसल्याची
आठवणीने मनामध्ये जागा ठेवली तू असल्याची

भास तुझा, आवाज तुझा, हृदय फक्त माझे
श्वास श्वासात गुंफिले मी तुझे आणि तू माझे

सोनाली रामलाल रसाळ, 
कापूसवाडगाव, ता. वैजापूर