यळकोट यळकोट जय मल्हार Marathi Kavita, Poem

सोनाली रामलाल रसाळ लिखित मराठी कविता यळकोट यळकोट जय मल्हार यामध्ये शिव अवतार खंडेरायचे गुणगान व वर्णन केले आहे

यळकोट यळकोट जय मल्हार Marathi Kavita, Poem

करण्या सोन्याची नगरी 
भोळा आवतरला जेजुरी
म्हाळसा असूनही पदरी
जीव जडला बानूवरी

काय सांगू बाई देवाचं 
करू गाऱ्हाणे की गुणगान
कैलास पर्वताचा धनी
करी शेळ्या मेंढ्याची राखण

भोळ्या बानूच्या मागे देवा
हिंडतो दऱ्या खोऱ्यात
कौतुकाचा तो मानकरी
बसला जाऊन धनगरात

भक्त भोळे देवा तुझे
पुजिते भाव भक्तीने
भक्त बानू होऊन लोकात
अवतार घेतला स्त्री शक्तीने

घेऊनी खोबरे प्रसाद 
उडवी भंडाऱ्याचा भडका
बानू आणि म्हाळसा दोघींचा
आसे मल्हारी मार्तंड लाडका

देवाने घेऊनी अवतार
केला धनगर कुळाचा उद्धार
भक्त करती जयकार
यळकोट यळकोट जय मल्हार

सोनाली रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव, ता. वैजापूर