राग तुझा माझ्यावर Marathi Kavita

स्त्रीच्या मनातील वेदना व्यक्त करणारी सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता राग तुझा माझ्यावर...

राग तुझा माझ्यावर Marathi Kavita

राग तुझा माझ्यावरचा माझ्या जीवनाचा भाग आहे
रोज रोज तू माझ्यावर रागावतो
ते तर मला मुळीच सहन होत नाही

तू माझ्यावर रागावला नाहीस तर मला मुळीच करमत नाही
झाड झुड करते सडा टाकते मी अंगणी
तू पाहतो दुरून डोळे वटारून

इकडून का टाकलस गं पाणी
तिकडून का टाकलस गं पाणी

मी काढू लागले ना रांगोळी तू मला म्हणतो
टाईम पास करते सकाळी सकाळी 
अशी कशी नार आली माझ्या भाळी

राग तुझा माझ्यावरचा चंद्राप्रमाणे हळूहळू वाढतो आहे.
त्यामुळे मन माझे आतल्या आत कुढते आहे.

आतापर्यंतचा माझा अनुभव आहे
रागवायची संधी तू नेहमीच शोधतो आहेस

राग तुझा माझ्यावरचा 
भाग बनला माझ्या प्रारब्धाचा

अभ्यास तू घेत नाही मुलांचा 
अशी तुझी नेहमीचीच भुणभुण

घेत बसले अभ्यास की लगेच कुणकुण लावतोस चहाची
मी थोडी थांबून करायला गेले की राग तुझा माझ्यावरी

गाडीची चावी सापडेना गेली की राग तुझा माझ्यावर
डबा तुझा भरायला उशीर झाला की राग तुझा माझ्यावर

कामावर जायला उशीर झाला की राग तुझा माझ्यावर
स्वयंपाक करायला उशीर झाला की राग तुझा माझ्यावर

तुला काही घेताना आम्ही काही मागितलं 
की तिथंच सार बिनसत पुन्हा आम्हाला म्हणता
आधी का नाही सांगितलं

फाईलमध्ये कागद पत्र तूच तर नेहमी ठेवतोस 
आणि ऐनवेळी सापडेना गेल्यास मलाच दोष देतोस

प्रत्येक तुझ्या अयशस्वी कामाचे
खापर माझ्या डोक्यावर फोडतो

आणि यश तुला मिळाले की तुझ्या यशाची गाथा स्वतः गातो 
प्रत्येक यशामागे मी आहे हे मात्र तू साफ विसरतो

कपाटातील कपडे मुलेच खालीवर करतात
आणि तुला ते अस्ताव्यस्त दिसले की राग तुझा माझ्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर पहिलं वाक्य तुझं 
माझे हे कुठं माझं ते कुठं अरे तुला ते आठवत नाही यात 
दोष नाही काही माझा तरी राग तुझा माझ्यावरच

असा कसा रागीट स्वभाव माणसाला देतो
त्याचा त्रास मात्र बायकोला होतो

तुझ्या मोबाईलवर काम तुच तर सांगतो 
अनवधानाने फोन हाती आला की लगेच तू बीचकतोस  
बहाण्याने तू लगेच फोनकडे धावतो
चूक काही नसताना राग तू माझ्यावर काढतो

Jayshree Arjun Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, 
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड