राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मॉल, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. पण सर्रास कोणत्याही दुकानात वाईन मिळणार नाही तर त्यासाठीचे काही नियमही लावण्यात आलेत . तर नियम असे आहेत एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा मोठ्या दुकानात किंवा सुपर मार्केट मध्येच वाईन विक्रीला परवानगी असेल आणि फक्त महाराष्ट्रातच तयार झालेली वाइन विकता येईल तसेच वाईनसाठी सेपरेट काउंटर ही ठरलेली असेल कोणत्याही खाद्य पदार्थ जवळ वाईन ठेवता येणार नाही
राज्य सरकार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील फळ उत्पादक शेतकरी वाईनरीजना मालाचा पुरवठा करतात . शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पण ह्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयावर टीका केली आहे. राज्य सरकारचे लक्ष कष्टकरी ,शेतकरी यांच्याकडे नाही तर राज्य सरकारचे लक्ष दारुड्याकडे आहे. महाराष्ट्राला राष्ट्र करण्याचा हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. तर त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत नवाब म्हणाले गोवा आणि हिमाचल प्रदेश मध्ये भाजपचे सरकार आहे तिथेही किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी आहे. पण तिथे भाजप विरोध करत नाहीत मग महाराष्ट्रातच का सवाल निर्माण होतात.
खरं पाहता कितीतरी दारूबंदी अनेक महिला संघटना प्रत्येक ठिकाणी कार्यरत असून दारूमुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. दारुड्या नवऱ्या मुळे विभक्त झालेली बायको तर एकीकडे दारू मुळेच विधवा झालेली स्त्री आपल्याला पाहायला मिळते .दारू पिऊन अपघात होणाऱ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रत व्यसनाधीन विरोधातील अनेक संघटना कार्यरत असून तरुणाला यावेळी त्यातून बाहेर काढण्यासाठी भरमसाठ व्यसनमुक्ती केंद्र ही आपल्याला पहायला मिळतील असे असताना तरुणाईला एक प्रकारचे चुकीचा संदेश देण्याचे काम राज्य सरकार करत आहे का ? शेतकऱ्यांच्या आड जाऊन महाराष्ट्र सरकार किराणा दुकानातही वाईन ठेवणार म्हणल्यावर महाराष्ट्रातील तरुणाईचे नेमके काय हा खुप मोठा प्रश्नही उपस्थित झालेला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे व्यसनमुक्ती केंद्रही चालवली जातात मग नेमक सरकारच चाललय तरी काय?
अर्पणा माने, कोल्हापूर