हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही? या स्तंभलेख स्पर्धेचा निकाल जाहीर

वरील स्पर्धेच्या परिक्षक म्हणून औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी तथा लेखिका अंजली धानोरकर या होत्या.

हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही? या स्तंभलेख स्पर्धेचा निकाल जाहीर

न्याय देणारा संवाद या जेष्ठ कवयित्री तथा स्तंभलेखिका जयश्री औताडे व ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांनी स्थापन केलेल्या साहित्यविषयक समुहात नेहमीच कथालेखन, पत्रलेखन, कवितालेखन अशा वेगवेगळ्या विषयांवर उपक्रम सुरू असतात. तसेच नवोदित साहित्यिकांना लेखनाविषयी मार्गदर्शन देखील समुहाच्या माध्यमातून केले जाते. यावेळी १२ जानेवारी जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही? या विषयांवर स्तंभलेख स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लेख आले. त्यात सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट असे लेख लिहिले होते. 

वरील स्पर्धेच्या परिक्षक म्हणून औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी तथा लेखिका अंजली धानोरकर या होत्या. त्यांनी १० पैकी गुण देऊन पुढील निकाल घोषित केला. त्यात प्रामुख्याने कु. कावेरी आबासाहेब गायके (वैजापूर) व जयश्री अविनाश जगताप (सातारा) यांचा ९.५ गुण मिळून प्रथम क्रमांक आला. तसेच संगीता थोरात (मुंबई), पल्लवी राहुल पवार (गंगापूर) व प्रतिमा अरून काळे (निगडी, पुणे) यांनी ९ गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील कवयित्री जयश्री उत्तरेश्वर औताडे यांनी ८.५ गुण गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच स्पर्धेसाठी मनीषा संदिप बैनाडे-महेर परसोडा, ता. वैजापूर, जयाबाई विनायक घुगे-मुंडे परळी, दत्तू हिरे, मनूर, ता. वैजापूर, योग काळे वाळुज महानगर औरंगाबाद, नवनाथ दिघे, कोपरगाव, योगेश कोंडके फुलंब्री, अनुराधा मोतेवार बीड, कु. स्नेहा कदम औरंगाबाद, मीना राजपूत कल्याण, विजेता चन्नेकर गोंदिया, प्रिती भालेराव पुणे, यांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला होता. तसेच विजेत्यांना उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक बाबा चन्ने यांनी दिली.


प्रतिक्रिया
१) न्याय देणारा संवाद या साहित्यविषयक समुहात मी नवीनच आहे. या समुहात उपजिल्हाधिकारी, पी.आय, ए.पी.आय, प्राचार्या, प्राध्यापक, चित्रपट अभिनेत्री, रेडिओ निवेदिका, चॅनल रिपोर्टर, शिक्षक तसेच सरकारी कार्यालयाचे महत्वाचे अधिकारी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या समुहात आहेत. माझे बंधू तथा ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांनी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास ८० महिलांचा साहित्यविषयक समुह बनवलेला आहे. तसेच ते साहित्यातील वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच सकारात्मक मार्गदर्शन करत असतात. ही खुप महत्वाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून शेकडो नवोदित साहित्यिक घडत आहे. ही साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय घटना आहे. असे मला वाटते.

Manisha Maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर (स्पर्धक)
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद