शब्दात न मावणारा बाबा

मी माझ्या आयुष्यात कधीच न पाहीलेले बाबा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व. नेहमीच आयुष्यवान राहील. जो दुसर्यांना जगण्याची शक्ती देतो, बळ देतो, प्रवृत्त करतो, जगवतो, तो माणूस नेहमीच अजरामर राहतो.

शब्दात न मावणारा बाबा

काही नाती नकळत जुळतात, कधी कधी मनातील भाव नकळत ओठांवर येतात, न सांगताच आपण ज्याच्याकडे व्यक्त होतो. मन हलकं करतो, कधी तरी मैत्रीण समजून सारं काही बोलून मोकळं होतो. त्यातलच एक उदाहरण म्हणजे प्रिय स्नेही बाबा. बाबा म्हणजे एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, एक गुणसंपन्न व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व, एक माणसातली माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व, एक निगर्वी निकपटी व्यक्तिमत्व, परिस्थितीची जाणं असणार व्यक्तिमत्व आणि त्यातून इतरांचा म्हणा किंवा समाजाचा विकास करणारं व्यक्तिमत्व, एक कर्तव्यदक्ष पती, एक कर्तव्यदक्ष पिता, एक कर्तव्यदक्ष मित्र, बाबाला कितीही उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील. जे अनुभवाने संपन्न आणि परिपूर्ण असतात. त्यांच्याजवळ जन्मापासूनची अनुभवाची शिदोरी असते. त्यांना आपण बाबा म्हणतो, असे हे नावात जादू असणारे तुमचे आमचे सर्वांचे बाबा, मित्रांचे ते लाडके, मैत्रीणींचे आवडते, कवयित्रींचे मनातले, कवींचे हृदयातले, असे आवडते आपल्या सर्वांचे बाबा.

एक शिस्तप्रिय, एक अभ्यासू ,
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व,


दिसायला सावळे असले तरी मनाने गोरे असणारे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व, सर्वाना आपलं समजून पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व,
परिस्थितीची जाण ठेवून सर्वांना मदत करणार व्यक्तिमत्व, अशा व्यक्तीची कितीही प्रशंसा केली, कौतुक केले तरी ते कमीच आहे, असे मला वाटते. म्हणूनच अशा सर्वस्वी सोज्वळ व्यक्तिमत्वाची खूप खूप प्रगती व्हावी आणि लवकरच त्यांनी त्यांच्या स्वप्नाचे परिपूर्णतेचे यशोशिखर गाठावे आणि अभिमानाने त्या सोबतच स्वाभिमानाने जगणाऱ्या या मनामनातील बाबाला मी मनापासून शुभेच्छा देते. अन् अशा व्यक्तिमत्वाला सॅल्यूट (salute) करते. 

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, युवा कवयित्री कावेरी गायके, कवयित्री कांचन पवार, ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने व आबासाहेब गायकेउपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, युवा कवयित्री कावेरी गायके,
कवयित्री कांचन पवार, ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने व आबासाहेब गायके

मी माझ्या आयुष्यात कधीच न पाहीलेले बाबा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व. नेहमीच आयुष्यवान राहील. जो दुसर्यांना जगण्याची शक्ती देतो, बळ देतो, प्रवृत्त करतो, जगवतो, तो माणूस नेहमीच अजरामर राहतो. अशा स्नेहप्रिय बाबाबद्दल मला पुढील कविता सुचली.

अगदी तुझ्यासारखा 
एक तरी मित्र असावा 
जो दिनराती माझ्या 
जवळच असावा 

तुझ्यासारखा प्रेमळ 
हसरा, लाजरा, हळवा 
मनापासून मला 
समजून घेणारा

तुझ्यासारखा नम्रतेने 
हसून बोलणारा
ज्ञानाचा गर्व न करता 
माझ्याशी वागणारा

न चिडता, न रागावता
आपलसं करणारा
मी थकली असेल तर
चहा घेशील का म्हणणारा

खरच, तुझ्यासारखा 
एक तरी मित्र असावा
जो दिनराती माझ्या 
जवळच असावा 

तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो सहज भावनांना
समजून घेणारा असावा

तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
माझ्या आयुष्यावर 
कविता करणारा असावा

तुझ्यासारखा 
एक तरी मित्र असावा
जो मनाच्या अगदी 
जवळ असावा

तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
तुझ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची
सर्वांवर छाप टाकणारा असावा

तुझ्यासारखा 
एक तरी मित्र असावा
जो हृदयाचा ठाव 
घेणारा असावा

खरंच तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो कायम मला मनात 
ठेवणारा असावा

आवडत्या व्यक्तीमत्वाबद्दल
आवडत्या माणसाबद्दल
आवडत्या मित्राबद्दल 
आवडत्या लेखकाबद्दल
आवडत्या कवीबद्दल

आवडत्या सुसंस्कृत माणसाबद्दल कितीही लिहलं तरी कमीच आहे. बाबा हा शब्दात न मावणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्या शब्दांना मी पूर्णविराम देते.

poonam bedse
सौ. पुनम चंद्रकांत बेडसे,
निवेदिका : आकाशवाणी केंद्र धुळे