(काव्यसंग्रहाची वर्षपुर्तीच्या निमित्ताने...)
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचे ग्रामीण साहित्यिक बाबाजी चन्ने यांच्यावर आधारित एक काव्यसंग्रह तयार झाला, आज २६ नोव्हेंबर रोजी बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले... अनेक नामांकित कवी व कवयित्रीसह अनेक दिग्गज यासाठी मेहनत घेत होते. मला आजही तो दिवस आठवतो ज्यावेळी रायटर्स वर्ल्डच्या युथ कट्टा या समूहाच्या प्रमुख पदावर कार्यरत होतो, हरिश्चंद्र दळवी त्यावेळी प्रशासक म्हणुन कार्यरत होते, बाबजींचा वाढदिवस होता. हरिश्चंद्र दळवी यांना मी अंदाजे सकाळी साडेनऊ वाजता फोन केला व सांगितले आज आपल्या समूहाचे सर्व पूर्व निवोजित उपक्रम बंद करून आज आपल्याला समूहाचे मार्गदर्शक बाबाजींचा वाढदिवस साजरा करायचा आहे. हरीचंद्र सर यांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या पाच मिनिटात सर्व तयारी करून समूहावर घोषणा केली. आम्ही सगळे जोमाने तयारीला लागलो. समूहाच्या परिक्षक जयाताई मुंडे यांनी 'येवो बहर क्षणांना' हा विषय देऊन अष्टाक्षरी या प्रकाराची माहिती देऊन विषय निवडला... मग काय सर्व तयारी झाली. अवघ्या सात ते आठ तासात अष्टाक्षरी प्रकारात असंख्य कविता प्राप्त झाल्या... संपूर्ण दिवसभरात असलेले सर्व कामे बाजूला ठेऊन आम्ही सर्वजण निवडक कविता बाजूला काढत होतो. विश्वभान प्रतिष्ठानचे संस्थापक जगदीश संसारे सर हे सुध्दा समूहावर मार्गदर्शन करत होते. त्यांनीही त्यावेळी खुप मदत केली. संध्याकाळपर्यंत ७० निवडक कविता बाजूला काढल्या... आता प्रश्न होता या सर्व कवितांचे परीक्षण करण्यासाठी एका दिग्गज अनुभवी परिक्षक आम्हाला हवा होता तो निवडण्याची जबाबदारी मी समूह प्रशासक हरी दळवी यांच्याकडे सोपवली, त्यांनी समूहात चर्चा करून विश्वभान प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष विंदा वीरकर यांची निवड केली. विंदा विरकर यांनी आठ दिवसाच्या आत निवडक ५६ कविता आमच्याकडे सोपवल्या.
या काव्यसंग्रहात प्रामुख्याने सौ. नीताताई भामरे नाशिक, ह.भ.प. प्रा. रामकृष्ण महाराज पाटील जळगाव, सौ. वर्षा बाविस्कर कल्याण, रझिया जमादार सोलापूर, सौ. विजया शिंदे मुंबई, सौ. पल्लवी चव्हाण उस्मानाबाद, सौ. सुलोचना पाटील सांगली, कु. प्रणोती शेंडे यवतमाळ, सौ. विनया तिडके सातारा, सौ. प्रिती जिवने भंडारा, सौ. प्रांजली काळबेंडे मुंबई, सौ. कल्पना सोनवणे जळगाव, सौ. सरोज गाजरे मुंबई, कु. कोमल डिगे सोलापूर, सौ. मनीषा मालपूरे जळगाव, सौ. जया मुंडे बीड, श्री. प्रकाश महामुनी सोलापूर, श्री. प्रकाश पिंपळकर चंद्रपूर, सौ. शितलादेवी कुलकर्णी मुंबई, श्री. मधूकर दुफारे चंद्रपूर, सौ. व्यंकनबाई चेनलवाड, सौ. पूनम बेडसे धुळे, ॲड. अश्विनी मेहता पुणे, श्री. जयराम कराळे ठाणे, सौ. सरोजा गायकवाड लातूर, संजिवनी इंगळे बुलढाणा, सौ. छाया टिकले चंद्रपूर, सौ. निरजा आत्राम चंद्रपूर, श्री. होणाजी मेस्त्री वसई, सौ. करिष्मा डोंगरे सोलापूर, सौ. सोनाली जगताप मुंबई, सौ. पूनम सुलाने हैद्राबाद, सौ. वीणा पाठक नाशिक, ॲड. सुलभा गोगरकर अमरावती, सौ. संगिता मालेकर चंद्रपूर, श्री. रविंद्र गिमोणकर नागपूर, सौ. राधा खानझोडे नागपूर, श्री. पांडूरंग आलीम रत्नागिरी, सौ. सुनिता कुलकर्णी पुणे, सौ. रंजना बोरा नाशिक, सौ. सायली कोयंडे सिंधूदुर्ग, सौ. संगिता कांबळे रायगड, सौ. वर्षा वराडे ठाणे, ॲड. रोहिणी पराडकर कोल्हापूर, सौ. संध्या परदेशी औरंगाबाद, श्री. राजेश वऱ्हाडे अकोला, सौ. सुरेखा मैड नाशिक, सौ. निवेदिता खासनीस डोंबिवली, सौ. राजश्री सुतार पुणे, श्री. हरिचंद्र दळवी ठाणे, सौ. लोपामुद्रा शहारे नागपूर, कु. कावेरी गायके वैजापूर, सौ. सरिता भांड पैठण, कु. सोनाली रसाळ वैजापूर, डाॅ. वैष्णवी मनगटे कन्नड व सौ. करूणा शिंदे पुणे या सर्व नामांकित लेखक लेखिकांचा समावेश होता.
त्या कविता इतक्या उत्कृष्ट होत्या की त्याचे इ-बुक बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण ज्यावेळी समूहात ही बातमी समजली त्यावेळी सगळ्यांनी याची हार्ड कॉपी तयार व्हायला पाहिजे अशी मागणी केली. प्रमुख या नात्याने प्रकाशकाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, आणि सह-संपादक म्हणुन सर्वानुमते सर्वाची लाडकी व बाबांची मानसकन्या ग्रामीण कवयित्री कु कावेरी गायके हिच्याकडे देण्याचे ठरले. मग काय त्यानंतर लगेच आम्ही 'वर्डलॅन्ड पब्लिसिग हाऊस' औरंगाबाद. या प्रकाशन संस्थेसोबत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला. 'मनामनातील बाबाजी' हे पुस्तक तयार करण्याच्या पाठीमागे एक उद्देश होता. तो म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक नामांकीत सारस्वतकारांनी अष्टाक्षरी या प्रकारात केलेल्या अप्रतिम अशा रचना जो कोणी वाचेल त्याच्या मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीतच शिवाय या पुस्तकाची प्रस्तावना जगदीश संसारे सरांनी अगदी भावपूर्वक लिहिली असून, प्रसिद्ध चित्रकार शशांक पाटील सर यांनी बनवलेले पुस्तकाचे मुखपृष्ठही सगळ्यांच्याच मनात बसेल असेच आहे. तसेच बाबाजीसारखं अद्भुत व्यक्तिमत्व रेखाटताना अनेक साहित्यिकांनी अगदी मनातून आपल्या अष्टाक्षरीत बाबांना यथाशक्ती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हणुनच या पुस्तकाचेही नाव 'मनामनातील बाबाजी' हे सर्वानुमते ठरवण्यात आलं...
बाबा हे नेहमीच नवोदित साहित्यिकांनाच नाही तर तरुणांनाही मार्गदर्शनाचं काम करतात. विविध वर्तमानपत्रातून नेहमीच अध्यात्मिक, क्रीडा, साहित्यविषय, सामाजिक तसेच प्रेम व आकर्षण यांसारख्या विषयावर आपल्या निर्भिड आणि निपःक्ष लेखणीने लिहित असतात. शिवाय बाबांचा मित्र परीवारही खूप मोठा आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटणं तसेच अनेक विषयावर त्यांच्याशी तासनतास चर्चा करणं हे बाबांच आवडतं काम, बाबांबद्दल बोलण्यासारखं खूप काही होत. एवढ्या साहित्यकारांनी तसेच प्रस्तावनेच्या निमित्ताने मा. संसारे सरांनी बाबांना आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला पण बाबा या सगळ्यात मावणारं व्यक्तीमत्व नव्हते पण फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे त्यांच्याबद्दल लिहण्यात आले. असेच म्हणावे लागेल.
त्याचबरोबर बाबांबद्दल बोलायचे झाले तर, बाबांकडे पाहिलं किंवा त्यांच्याशी बोललं की नेहमीच मला संत तुकारामांचे अनेक गुण त्यांच्यात दिसतात. शिवाय संत तुकारामांच्या ओळीही आठवतात.
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥
वरील ओळींचा अर्थ म्हणजेच जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाऊलांचे मी वंदन करतो.
त्याच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून कायमस्वरूपी राहीन. त्याचा दास होऊन त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन.
माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे." अगदी असच व्यक्तीमत्व मला बाबांतून नेहमीच जाणवतं.
बाबा पण असच व्यक्तिमत्व जसं बोलतात, जसं लिहतात, अगदी तसच वागतात... म्हणुनच हे पुस्तक फक्त साहित्यप्रेमींनाच नाही तर सर्व स्तरातील व्यक्तींना या पुस्तकाच्या माध्यमातून एक नवी प्रेरणा मिळेल शिवाय अष्टाक्षरी या लोकप्रिय प्रकाराची माहितीही होईल आणि बाबांना मनामनातून समजून घेण्यास मदत होईल. खरं तर अशा व्यक्तिमत्वाबद्दल अनेक जन लिहत असतात. पण एकाच प्रकारच्या कवितेच्या माध्यमातून अनेक नामांकीत कवींनी एकत्र येऊन एका व्यक्तिमत्वावर मनमोकळं लिहणं आणि त्याचं आय.एस.बी.एन. प्राप्त पुस्तक तयार होणं आणि याची संपादनाची जबाबदारी माझ्याकडे येणं हे माझ्यासाठी स्वप्नवतच होतं. पण म्हणतात ना..! चांगल्या कामाची फक्त सुरुवात करायची असते हजारो हात आपोआप मदतीला तयार होतात. याचा प्रत्यक्ष अनुभव या पुस्तकाचे संपादन करताना मला आला. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, पण याचे पुस्तक तयार करणे. हे जबाबदारीचे काम पूर्ण होण्यास आम्हाला अनेक अडचणी ला सामोरे जावे लागले. पण अनेक दिग्गचांचे आशिर्वाद आणि सहकार्य सोबत असल्यामुळे शेवटी हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. आम्हा सर्वांचे लाडके तसेच समूहाचे मार्गदर्शक बाबा यांच्या सुंदर अशा मुखपृष्टाचे पुस्तक पूर्ण झाले. यासाठी शशांक पाटील यांनी खुप मेहनत घेऊन हे मुखपृष्ठ साकारले. त्याचबरोबर श्रीमती जयश्री औताडे मॅडमनेच बाबांबद्दलचे मनोगत सुध्दा अतिशय बोलके होते.
आता वेध लागले ते पुस्तकाच्या प्रकाशनाचे, जरी पुस्तकाच्या हार्ड कॉपी तयार झाल्या असल्या तरी याच्या प्रकाशनाशिवाय हे पुस्तक अपूर्णच होतं. शेवटी आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य व वर्डलॅन्ड पब्लिसिग हाऊस, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील श्रमिक पत्रकार भवन सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून 'मनामनातील बाबाजी' या प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्यावर लिहिल्या गेलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक, मा. सनदी अधिकारी व ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख हे लाभले.
तसेच प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ तथा विचारवंत ॲड एन. डी. पाटील हे होते तर काव्यसंग्रहावर भाष्य जेष्ठ कवयित्री जयश्री औताडे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य. या संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदिप चोपडे, सचिव प्रा. दिपक दळवी व संस्थेचे सर्व सदस्य यांनी केले. व शेवटी आमच्या सर्वाचे स्वप्न साकार झाले..
जरी या पुस्तक प्रकाशित होऊन एक वर्ष उलटली असली तरी या पुस्तकाचा प्रवास आजही डोळ्यासमोर जशाच्या तसा दिसतो. कारण या प्रवासात आम्हाला खुप काही शिकायला मिळाले, नवीन आत्मविश्वास मिळाला, जरी या पुस्तकाचा संपादक असलो तरी हे सर्व श्रेय वर नमूद केलेल्या सर्व दिग्गज मंडळीचे आणि माझे लाडके ग्रामीण साहित्यिक बाबाजी चन्ने यांचे आहे. यांचे आभार तर नाही मानणार पण हे आमचे सर्वाचे एकमेकांवरील व वाचकांचे पुस्तकावरील हे अतूट प्रेम असेच टिकुन राहावे यासाठी प्रार्थना करेन. वाचकांशिवाय लेखक अपूर्ण असतो. पण मनामनात बसणाऱ्या या बाबाजीवर आधारीत असलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्रात अनेक वाचक मिळाले याचा अजूनही खुप अभिमान वाटतो. त्याचबरोबर आनंदाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आजही प्रकाशक यांच्याकडे वाचकांना उपलब्ध आहे.
अमर आर. भुंगुर्डे,
प्रमुख - राईटर्स वर्ल्ड साहित्यिक शृंखला, उस्मानाबाद