बुद्धी आणी शहाणपण

'क ळतंय, पण वळत नाही हे ज्याच्या त्याच्या तोंडी असलेले विधान म्हणजे त्यांच्याकडे कळण्यासाठी लागणारी बुद्धी आहे; पण वळण्यासाठी लागणारे शहाणपण नाहीये' याची प्रत्यक्ष कबुलीच आहे.

 बुद्धी आणी शहाणपण

'कळतंय, पण वळत नाही हे ज्याच्या त्याच्या तोंडी असलेले विधान म्हणजे त्यांच्याकडे कळण्यासाठी लागणारी बुद्धी आहे; पण वळण्यासाठी लागणारे शहाणपण नाहीये' याची प्रत्यक्ष कबुलीच आहे. पाऊस आहे आणि आकाशात संपूर्ण इंद्रधनुष्य [इंद्रवज]पण आहे हे दृश्य बघायला जसे दुर्मीळ तसेच एखादी व्यक्ती बुद्धिवान आणि शहाणीपण आहे हे मिश्रण अनुभवायला मिळणे दुर्मीळ ! माणसाची बुद्धिमत्ता विकसित होणे आणि माणूस 'शहाणा' होणे यात कमालीचा फरक आहे. शहाणा माणूस बुद्धिवान असू शकतो, पण बुद्धिवान माणूस शहाणा असेलच असे नाही. किंबहुना जेवढे माणसाचे क्वालिफिकेशन जास्त, वय जास्त तेवढा त्याच्यातला शहाणपणा कमी आणि शहाणपण शिकण्याची इच्छा त्याहून कमी हे आजचे कटू वास्तव आहे.

'नाशिक जवळचे आंबोली छानपैकी डोंगरांच्या कुशीत, जंगलाच्या वेढ्यात वसलेले आहे. तिथे एकदा आमच्या मित्राच्या घरी स्त्रथहद्रह्यह्न या विषयावर संशोधन करणारा एक माणूस परदेशातून आला होता. जंगल या विषयावरचे भरपूर ग्रंथ, फोटो, मुव्हीज असे बरेचसे मटेरिअल त्याच्याकडे होते. त्यात वनस्पतींची, पशू पक्ष्यांची, जंगलातल्या वातावरणाची प्रचंड माहिती होती. आणि त्याचेही वाचन दांडगे होते. तो आम्हाला विविध माहिती देत असताना तिथे आमचा पांडू आला. हा पांडू आदिवासी. जंगलातच लहानाचा मोठा झालेला. त्यामुळे त्यालाही उत्सुकता होती जंगल या विषयाची. पांडू ती सर्व पुस्तके, फोटो पाहून खूप थक्क झाला. त्याच्या दृष्टीने माणसाच्या दृष्टीने जंगलाचा अभ्यास एवढा महत्त्वाचा असू शकतो हेच नवल होते. थोड्याच वेळात त्याची त्या परदेशी पाहुण्याशी छान मैत्री झाली. मी दुभाषाचे काम करत होतो. आम्ही जंगलात फेरफटका मारायचे ठरवले. रानात प्रवेश केल्याबरोबर एका पक्षाचा ष्टड्डयद्य आला. तो आवाज ऐकून पांडू सहजच म्हणाला 'या वेळी पाऊस लवकर येणार बरका !' आता है मी त्या पाहुण्याला जेव्हा सांगितले तेव्हा तो उडालाच. त्याने विचारले 'तुला कसं कळलं?' तर पांडू उत्तरला हा काय पावश्या पक्षाचा आवाज आता ऐकला ना, हा पक्षी म्हणजे पावासाळ्याचा दूत. यांना बरोबर कळते पावसाची चाहूल. आणि ती लागली की आनंदाने ते जो आवाज काढतात तोच हा आवाज आहे.' हे ऐकून पाहुणा पांडूचे पायच धरायचे बाकी होता.

तो म्हणाला की 'इतकी वर्षे मी जंगलांचा, तिथल्या जीवनाचा अभ्यास करतोय, पण मला काही हे ज्ञान नाही. या पांडूशी कसे प्रत्यक्ष जंगल बोलते आहे, त्याला जंगल वाचता येते आहे. पण माझे मात्र तसे नाही'. जंगल हा पांडूचा सहज श्वास होता. त्याचे जंगलावर उत्कट प्रेम होते. त्या प्रेमातून जंगलाने त्याला शहाणे केले. पाहुण्याचा जंगल हा अभ्यास होता. या अभ्यासातून त्याला जंगलाने बुद्धिमत्ता दिली. दोन्ही गोष्टींना आपापल्या मर्यादा आहेत. पण पाहुण्याची बुद्धिमत्ता आणि पांडूचे शहाणपण जर एकत्र आले तर मात्र जो परिणाम असेल तो गगनाला गवसणी घालणारा असेल.

उन्हाळ्यात आपण कासच्या पठारावर गेलो तर तिथे माळरानाशिवाय काहीच दिसत नाही. जर कुणी आपल्याला सांगितले की इथे मुसळधार पाऊस पडून गेल्यावर सप्टेंबर महिन्यात निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. नजर संपेपर्यंत हजारो लाखो रानफुलांचा विलोभनीय गालिचा तयार झालेला असतो तर आपला विश्वासच बसणार नाही. पण कासच्या मातीत हे शहाणपण रुजलेले आहे. त्या मातीचा ते एक अविभाज्य अंग झालेले आहे. फक्त मुसळधार पावसाचा अविरत वर्षाव होण्याचा अवकाश की त्या भूमीतून हे शहाणपण हजारो रानफुलांच्या स्वरूपात आविष्कृत होते. तसेच प्रत्येक माणसाच्या मनात शहाणपण असतेच. त्याची ओळख व्हावी लागते. ते आपल्यात आहे ही प्रगाढ श्रद्धा निर्माण व्हावी लागते. आणि स्वत:वर, जगण्यावर आणि जीवनावर डोळसपणे प्रेमाचा वर्षाव करावा लागतो तरच ते उमलते. कासचे पठार दीडएक महिनाच बहरते. पण एकदा उमललेले शहाणपण परत कधीही कोमेजत नाही, ते फुलतच जाते. बहरतच जाते.

माणसाच्या मनातले शहाणपण एकदा उमलले की त्याचा प्रकाश आणि सुगंध असतो शेवटच्या श्वासापर्यंत !

आज घराघरात बुद्धी आणि शहाणपण यांचा संगम झालेली अपूर्व व्यक्तिमत्त्वे निर्माण होणे ही समाजाची सर्वात महत्वाची गरज आहे. आपल्या लहानग्यावरच्या अतिप्रेमामुळेच त्याच्या चहऱ्यावरची रेष अन रेष आई वाचू शकते. कॉम्प्युटरवरच्या अशा प्रेमामुळेच स्टीव्ह जॉब्स Apple च्या माध्यमातून सर्वमान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र क्रांती आणू शकतो. आणि मार्क झुकरबर्ग फेसबुक निर्माण करुन सर्व जगाला जोडू शकतो. अभिनयावरच्या अशा प्रेमामुळेच अमिताभ बच्चन विविध भूमिकांमध्ये कमालीचे रंग भरु शकतो. आणि सचिन वयाच्या चाळिशीमध्येही क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरू शकतो.

ज्या गोष्टीवर व्यक्तीचे असे प्रेम जडते तेव्हा ती गोष्ट त्या व्यक्तीशी बोलू लागते. मला अजून छान कसे कर, माझ्यात अजून काय काय छान दडले आहे हे. तीच गोष्ट त्या व्यक्तीला सांगायला लागते. मग भीमसेनजीशी मारवा बोलायला लागतो आणि ती मैफल अविस्मरणीय होते. अब्दुल कलामांशी मिसाईल बोलू लागते आणि भारताची मान जगात ताठ होते. प्रकाश आमटेंशी आदिवासी बोलू लागतो आणि आदिवासींच्या आयुष्यात पहाट उमलते. शेतकर्याशी काळी आई बोलू लागते आणि तिच्यातून अन्नाच्या राशी निर्माण होतात. अन्नपूर्णेशी पदार्थ बोलायला लागतो आणि त्या पदार्थाच्या स्वादाने रसवंती तृप्त होते. 'स्वत: वर, जगण्यावर, जीवनावर भरभरून डोळस प्रेम करणारे जागरूक मनच शहाणपणाशी जोडले जाते"

जीवनावरच्या, जगण्यावरच्या आणि स्वत:वरच्या अशा प्रेमातून मला मिळालेले शहाणपण :
जीवन पॅरिपूर्णच आहे. पण या परिपूर्ण जीवनाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी आपली वृत्ती आणि दृष्टिकोनपण परिपूर्णच पाहिजेत.'
'आपला Attitude आणि Perspective वृत्ती आणि दृष्टिकोन म्हणजे आपल्या मनाचे आपल्या नकळत झालेले प्रोग्रामिंग आहे. ते काही दगडावर कोरले गेलेले कधीही बदलता न येणारे शिलालेख नाहीत.
हे प्रोग्रामिंग मनाची जागरूकता Awareness विकसित करून बदलता येते आणि त्यातून आपल्या जगण्याचा, performanceचा दर्जा आपल्याला निश्चितपणे उंचावता येतो.

तुम्ही म्हणाल तुमच्या शहाणपणाचा आम्हाला काय उपयोग? तर तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. दसऱ्याचे शहाणपण आपल्याला आयते कधीच उपयोगी पडत नाही. प्रत्येकाला आपापले शहाणपण hard earn करावे लागते. पण आधी प्रवास करून आलेला एक मित्र दसऱ्या मित्राला अत्यंत आपुलकीने त्याचा प्रवास आनंदाचा होण्यासाठी, त्याच्या इच्छित ठिकाणी लवकर पोहचण्यास मदत होण्यासाठी, मध्येच रस्ता न चुकण्यासाठी जसे सहाय्य करतो तीच माझी भूमिका आहे. कुठल्याही गुरुची नाही हे मी अत्यंत नम्रपणे नमूद करू इच्छितो.