भावनांचा कल्लोळ च्या मुखपृष्ठची होतेय सर्व स्तरातून चर्चा

औरंगाबाद येथील बाबा चन्ने यांनी संपादित केलेल्या 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहाला हरियाणा येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक राधेश्यामजी गोमला यांनी प्रास्थावना लिहिलेली असून या कथासंग्रहासाठी मुखपृष्ठ वैजापूर येथील चित्रकार शंशाक पाटील यांनी काढलेले आह

भावनांचा कल्लोळ च्या  मुखपृष्ठची होतेय सर्व स्तरातून चर्चा

औरंगाबाद येथील 'वर्ड लॅन्ड पब्लिशिंग हाऊस' या प्रकाशन संस्थेने नुकतेच प्रकाशित केलेले 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठाची विविध स्तरातून चर्चा होताना दिसून येत आहे.

औरंगाबाद येथील बाबा चन्ने यांनी संपादित केलेल्या 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहाला हरियाणा येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक राधेश्यामजी गोमला यांनी प्रास्थावना लिहिलेली असून या कथासंग्रहासाठी मुखपृष्ठ वैजापूर येथील चित्रकार शंशाक पाटील यांनी काढलेले आहे. त्याच मुखपृष्ठाची चर्चा विविध स्तरातून होत आहे. शंशाक पाटील यांनी मुखपृष्ठाच्या माध्यमातून जिवंत भावनांचे रेखाटन केलेले मुखपृष्ठात दिसून येत आहे. त्यांनी काढलेले मुखपृष्ठ मुंबई पुण्याच्या मुखपृष्ठकाराला लाजवेल असेच आहे.

तसेच या कथासंग्रहात एकुण २१ नवोदित लेखक लेखिकांच्या २३ कथा असून त्यात प्रामुख्याने संपादक  बाबा चन्ने औरंगाबाद, सहसंपादिका अर्पणा माने कोल्हापूर, सुनिल रामचंद्र पवार मुंबई, गोविंद श्रीमंगल लातूर, अतिश म्हात्रे अलिबाग, रेश्मा पवार मुंबई, प्रा. राजाराम यशवंत मलगुंडे सांगली, जयश्री अविनाश जगताप सातारा, उज्वला पवार जळगाव, सरोजा मनोहर गायकवाड लातूर, नागसेन तुळसे हिंगोली, प्रतिमा अरूण काळे पुणे, डाॅ. गोविंद पांडूरंग चौधरी नांदेड, सरिता उध्दव भांड-खराद पैठण, संजीवनी सदानंद इंगळे, औरंगाबाद, जयाबाई विनायकराव घुगे-मुंडे बीड, सुधीर पाटोळे पुणे, राहुल साहेबराव सोळस वैजापूर, दर्शन जोशी संगमनेर, पंडितराव वराडे औरंगाबाद, मारोती मोतीराम कुळसंगे शेगाव बुलढाणा अशाप्रकारे महाराष्ट्रातील विविध भागातील लेखक लेखिकांनी कथासंग्रहासाठी लेखन केलेले आहे.

प्रतिक्रिया 


१) 'मानवी भावना एका चित्रात मांडणं तसं अशक्यच म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने त्या चित्रात मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला!' ' वर्ड लॅन्ड पब्लिसिग हाऊस, औरंगाबाद या प्रकाशन संस्थेचे संपादक बाबा चन्ने यांनी संपादित केलेल्या 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहासाठी मुखपृष्ठ साकारतांना आलेला अनुभव खरंच अविस्मरणीय असा होता. या कथासंग्रहात जवळपास विविध २१ नवोदित लेखक -लेखिकांच्या एकूण २३ कथा शब्दबद्ध केल्या आहेत. नवोदित लेखकांच्या लेखनाला नेहमीच प्रोत्साहन देणारे लेखक तसेच आमच्या वैजापूरचे भुषण आदरणीय 'बाबा चन्ने' यांनी मुखपृष्ठाच्या माध्यमातून या कथासंग्रह निर्मितीत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.

शंशाक पाटील, वैजापूर 
       (चित्रकार)

२) माझा नेहमीच एक उद्देश राहीलेला आहे. तो म्हणजे नवोदित लेखक लेखिकांनी लिहिते झाले पाहिजे. ज्याला ज्या कलेत रस आहे. त्याने ती कला जोपासली पाहीजे. त्याच कारणामुळे मी आजपर्यंत अनेकांना लिहिते केलेले आहे. 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहातही अनेक नवोदित चेहरे आहेत. तसेच मुखपृष्ठाच्या बाबतीत पुणे व मुंबई नेहमीच पुढे असायची. परंतु शंशाक पाटलांसारखा चित्रकार वैजापूरसारख्या ग्रामीण भागात राहुनदेखील पुणे, मुंबईच्या चित्रकारांना लाजवेल असे चित्र काढतो. ही एक खुप महत्त्वाची बाब आहे. तसेच साहित्य क्षेत्रात काम करत असतांना मला अनेक हिरे सापडले त्यात प्रामुख्याने कु. कावेरी गायके वैजापूर, सौ. प्रिती भालेराव पुणे, कु. कोमल डिगे बार्शी यांचे नावे घ्यावेच लागतील. माझी एक इच्छा आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी साहित्यात माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत २० ते २५ माणसं असे घडवील की त्यांचा पूर्ण देशाला हेवा वाटेल.  

बाबा चन्ने, औरंगाबाद