मराठवाड्याला लेखकांची खाण म्हटल्या जाते. अनेक प्रतिभावंत लेखक मराठवाड्यात घडले. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा वैजापूर तालुका. या तालुक्याला इ. स. १६०० पासून खुप मोठी साहित्य परंपरा लाभलेली आहे. त्यात प्रामुख्याने संत बहीनाबाई पाठक, जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, उत्तम बावस्कर, धोंडिरामसिंह ठाकूर, बाबा चन्ने हे वैजापूर तालुक्यातील महत्वाचे लेखक आहेत. यांनी महाराष्ट्रभर तालुक्याचे नाव उज्ज्वल केलेले आहेत.
कावेरी गायके ही वैजापूर तालुक्यातील भीवगावसारख्या ग्रामीण भागात राहणारी मुलगी. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट काव्य लिहिणारी, मनमोहक कविता तसेच लेख लिहिणारा साहित्य क्षेत्रातील महत्वाचा नवीन चेहरा माझ्या आयुष्यात नव्यानेच आलेला.
साहित्यक्षेत्रामध्ये खूप कमी वेळात नावलौकिक मिळवणारी मुलगी म्हणजे कावेरी. साहित्यक्षेत्रामध्ये वय, नाव, गाव या गोष्टी गौण मानल्या जातात. त्या व्यक्तीचे लेखन सर्वकाही सांगून जाते. आजपर्यंत कावेरी गायके यांनी अनेक प्रकारचे लेखन केलेले आपल्याला दिसून येते. एका शेतकरी आणि गरिब कुटुंबात जन्मलेल्या कावेरीने अत्यंत गरीब परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आजपर्यंत मी कावेरी यांचे भरपूर लेख वाचले, त्यांनी त्यांच्या प्रत्येक लेखामधून त्या योग्य आणि प्रभावी असेच लेखन केल्याचे आपल्याला दिसून येते. आत्ताच त्यांनी "भावनांचा कल्लोळ" या पुस्तकाचे अगदी चोखपणे समिक्षण केल्याचे दिसून आले. त्यांचे लेखन हे वाचकांवर सकारात्मक परिणाम करणारे असते. कावेरी यांना प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांचा साहित्यिक वारसा मिळाला. चन्ने सरांबद्दल बोलावं तितके कमीच आहे. अशा व्यक्तीची माणसकन्या म्हणुन घेणं ही सोपी गोष्ट नाही बरं का! सरांच्या मार्गदर्शनाखाली कावेरी यांची साहित्यिक वाटचाल झपाट्याने घडत आहे.
खरं तर कावेरी यांची साहित्याविषयी असणारी गोडी ही त्यांच्या लेखणातून दिसून येते. दिलेला प्रत्येक विषय अगदी सहजपणे मांडणे हे कावेरीच्या लेखनाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. कावेरी यांच्याशी माझा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या गुणांची ओळख मला झाली. अतिशय सुस्वभावाच्या असणाऱ्या कावेरी मॅडम ग्रामीण भागातील कृर्षी क्षेत्रावर अगदी मनापासून प्रेम करतात. कित्येक वेळा ग्रामीण भागातील वेगवेगळे प्रश्न त्यांनी आपल्या लेखामधून प्रभावीपणे मांडलेले दिसून येतात. त्या उत्कृष्ट कवयित्री, उत्कृष्ट स्तंभलेखिका देखील आहे. त्यांच्या उत्कृष्ट लेखनामुळे आणि स्वभावामुळे सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक वाचक आपल्याला बघायला मिळतात.
आपली साहित्यक्षेत्रामध्ये वाटचाल भव्य दिव्य व्हावी आणि यशाचे उत्तुंग शिखरे आपण गाठावित. आपल्या प्रगतीचा आलेख असाच दिवसेंदिवस वाढत जावो हीच आपलेला माझ्यासारखा वाचकाकडून शुभेच्छा. तसेच आपणास उत्तम आरोग्य आणि सुख शांती मिळो हीच जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा.
सौ. प्रिती भालेराव, पुणे