न्याय देणारा साहित्य परिवारातील नवदुर्गा

या ज्ञानवर्धक लेखात साहित्य आणि कुटुंबातील न्याय टिकवून ठेवण्यासाठी नवदुर्गाची भूमिका जाणून घ्या.

न्याय देणारा साहित्य परिवारातील नवदुर्गा

सौ. पूनम चंद्रकांत बेडसे

सौ. पूनम चंद्रकांत बेडसे या देवपूर धुळे येथील रहिवासी असून त्या धुळे आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका आहेत. उत्तम आवाज ही सौ. पूनम चंद्रकांत बेडसे यांना परमेश्वराने दिलेली देणगीच म्हणावी लागेल. तसेच त्या उत्तम कवयित्री आणि स्तंभलेखिका देखील आहेत. 'अगदी तुझ्यासारखाच' ही त्यांची सुप्रसिध्द कविता विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी विविध चित्रपटात देखील उत्तम अभिनय केलेला आहे. अनेक गीते देखील त्यांच्यावर चित्रित झालेले आहे. सौ. पूनम चंद्रकांत बेडसे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात भरारी घेतलेली असून प्रतिकूल परिस्थितीत आनंदी कसं रहावं... हा त्यांचा विशेष गुण आहे. तसेच त्या न्याय देणारा साहित्य परिवाराच्या प्रमुख देखील आहेत.

Poonam bedse


सौ. अंजली धानोरकर

सौ. अंजली धानोरकर या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. त्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असून उपजिल्हाधिकारी आहेत. तसेच त्या मोटिव्हेशन स्पिकर, लेखिका, अनुवादक, व्याख्याता देखील आहेत. त्यांचे 'मला IAS व्हायचय'(अनुवादित), 'व्यक्तीमत्व विकासासाठी साॅप्ट स्किल्स', 'द लिडर इन यू' (अनुवादित), इत्यादी व्यक्तीमत्व विकासावरील पुस्तकं प्रकाशित आहेत. त्या एक उत्तम, प्रामाणिक अधिकारी असून प्रशासनात त्यांचा दबदबा आहेत. 'न्याय देणारा साहित्य परिवार' या साहित्य समुहाच्या त्या मार्गदर्शक असून परिवारात होणाऱ्या विविध स्पर्धाच्या त्या परिक्षक देखील राहिलेल्या आहेत.

anjali dhanerkar


सौ. शितल प्रमोद बाविस्कर-राणेराजपूत

सौ. शितल प्रमोद बाविस्कर-राणेराजपूत या खान्देश विभागातील जळगाव शहरातील रहिवासी असून त्या जि.प. मुलींची मराठी शाळा, किनगाव (बुद्रुक), ता. यावल या ठिकाणी शिक्षिका आहेत. त्या विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका आहेत. सौ. शितल प्रमोद बाविस्कर-राणेराजपूत या उत्तम कवयित्री असून उत्कृष्ट स्तंभलेखिका देखील आहेत. 'सन्मानाने जगतांना', 'आला श्रावण', 'मैत्रीच्या पलिकडे', 'एक होती इरशाळवाडी', 'सन्मान', 'बुध्दीपुढील पडणारे प्रश्न', 'आता धाव बा विठ्ठला', 'आस जगण्याची' 'अवकाळी पाऊस', तसेच दोनशेच्यावर त्यांनी 'अनमोल विचार' देखील लिहिलेले आहे.

shital baviskar


सौ. स्वाती बाळासाहेब ठुबे-खोदडे

सौ. स्वाती बाळासाहेब ठुबे-खोदडे या अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूर पठार, ता. पारनेर येथील रहिवासी आहे. त्या सध्या प्रशासकीय सेवेत असून अहमदनगर जिल्हा परिषदेत 'औषधनिर्माण अधिकारी' म्हणून कार्यरत आहे. त्यांची एक प्रामाणिक अधिकारी म्हणून जिल्हाभर परिचित आहे. तसेच त्या कवयित्री व लेखिका देखील आहे. महाराष्ट्रातील विविध दैनिकात, दिवाळी अंकात त्यांचे शेकडो लेख व कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे 'स.न.वि.वि.', 'आई', 'स्वप्न' इत्यादी पुस्तके प्रकाशित आहे. तसेच त्यांना आतापर्यंत विविध संस्थांचे जवळपास पंचवीस पुरस्कार मिळालेले आहेत. व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांना विविध ठिकाणी विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन देखील केलेले आहे.

swati thube


श्रीमती. कांचन पांडूरंग चव्हाण

श्रीमती. कांचन पांडूरंग चव्हाण या छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असून त्या वरद विद्या मंदिर एन- २ सिडको, येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या एक आदर्श शिक्षिका आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. तसेच त्या उत्कृष्ट लेखिका व कवयित्री देखील आहेत. त्यांचे 'कृता' व 'कृषिका' हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. 'कृता' या संग्रहाला संकल्प फाउंडेशन तिरपण तर्फे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देखील भेटलेला आहे. तसेच विविध नामांकित दैनिकातून त्यांचे शेकडो लेख व कविता प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे.

kanchan chavhan


सौ. शिल्पा सिन्हा-देवकर

सौ. शिल्पा सिन्हा-देवकर या कोल्हापूर शहरातील रहिवासी असून त्यांनी जुलै २००० मध्ये 'रेलीश इन्फोसॉफ्ट' या संस्थेची स्थापना केली. आज पूर्ण देशात रेलीशच्या ५२ शाखा कार्यरत आहेत. आजपर्यंत ह्या संस्थेतून ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ग्राफिक्स, ॲनिमेशन, आणि व्ही.एफ.एक्सचे शिक्षण देऊन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नौकरी दिली आहे. रेलीश ला नॅशनल आणि इंटरनॅशनल अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१८ मध्ये कोल्हापूर शहरातच व्ही.एफ.एक्स. स्टुडिओ सुरू केला आणि कोल्हापूरच्या मुलांना अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी व्ही.एफ.एक्सचे काम करायची संधी मिळवून दिली. तान्हाजी, टोटल धमाल, माऊली, ८३ (कपिल देव), ओडियन, आर.आर.आर. अशा १०० हून अधिक चित्रपटांचे काम सौ. शिल्पा सिन्हा-देवकर यांच्या माध्यमातून झाले आहे. सर्व कामाचा आढावा घेऊन फेब्रुवारी Global Triumph Foundation तर्फे सौ. शिल्पा सिन्हा-देवकर यांना World's Women Icon 2022 ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्या उत्तम लेखिका आणि कवयित्री देखील आहेत.

shilpa divekar


सौ. मीना (गौरी) शिंदे

सौ. मीना (गौरी) शिंदे या अहमदनगर जिल्ह्यातील नाटेगाव, ता. कोपरगाव येथील शेतकरी कुटुंबातील रहिवासी आहे. शेतीमातीशी प्रामाणिक राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी लेखनाचा छंद जोपासलेला आहे. शेतातील कष्टकरी स्त्री ते साहित्य लेखन हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. परंतु त्या तिथपर्यंत पोहचल्या ही खरच खूप प्रेरणादायी बाब म्हणावी लागेल. त्यांचे 'शौर्यगाथा स्वराज्याची' हे ऐतिहासिक पुस्तक प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे 'बाबाजींची जीवनगाथा' हे संत जनार्दन बाबांच्या जीवनावर अखंड (दीर्घ) काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच विविध दैनिकात त्यांचे शेकडो लेख व कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत

mina shinde


सौ. कावेरी दिलीप पगार

सौ. कावेरी दिलीप पगार या वैजापूर तालुक्यातील गोळवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य स्त्री. आपल्या शेतात मका, बाजरी, कापूस, भुईमूग या पिकात रमणारी कवयित्री म्हणजे सौ. कावेरी दिलीप पगार होय. साध्या शब्दात पण अर्थपूर्ण कविता लिहणं, हे त्यांचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. बालपण शेतात गेलं, लग्नानंतरही आयुष्य शेतात चाललंय त्यांच्या कवितेत बापाचे कष्ट आणि आईचा त्याग नेहमीच जाणवतो. आठवण आईची, माझा बाप, मेघ-धरती, आयुष्य व सांजवेळ ह्या त्यांच्या गाजलेल्या कविता. या ग्लोबल दुनियेत हायफाय- चकाचक हे नेहमीच फसवं असतं आणि साधं हेच सत्य असतं हे नेहमीच त्यांच्या बोलण्यातून आणि कवितेच्या शब्दांतून जाणवतं.

kaveri pagar


कु. कावेरी आबासाहेब गायके

कु. कावेरी आबासाहेब गायके वैजापूर तालुक्यातील भिवगाव या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील असून त्या उत्कृष्ट कवयित्री, लेखिका, संपादिका आहेत. त्यांच्या लेखनातून नेहमी शेतकऱ्यांच्या वेदना जाणवतात. शेतकरी जगला पाहीजे, शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, त्याच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे असे अनेक विषय त्यांच्या लेखनातून आपलेला वाचायला मिळतात. त्याप्रमाणेच कु. कावेरी आबासाहेब गायके या ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांच्या मानसकन्या म्हणून परिचित आहे. तसेच त्या 'मनामनातील बाबाजी' व 'आजची जिजाऊ शिवबा निर्माण का करू शकत नाहीत', या दोन लोकप्रिय पुस्तकांच्या संपादिका देखील आहेत.

kaveri gayake


कु. वैष्णवी विठ्ठल मनाळ

कु. वैष्णवी विठ्ठल मनाळ ही गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील एका शेतकरी कष्टकरी कुटूंबातील मुलगी. परमेश्वराने भरभरून बुध्दीमत्ता व वकृत्व द्यावं असच काही वैष्णवीच्या बाबतीत घडलं. 'वकृत्वाची सरस्वती' म्हणून वैष्णवीची मराठवाड्यात ओळख आहे. देशाच्या अर्थमंत्री महोदयांनी वैष्णवी व्याख्यान लक्षपूर्वक ऐकावं, यापेक्षा दुसरा मोठेपणा काय असू शकतो. वकृत्वाप्रमाणे लेखनातही वैष्णवी अग्रेसर आहे. तीचा 'मी अजून कोसळलेले नाही' हा बहुचर्चित काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे 'जिजाऊ' हा चरित्रग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. एक नक्कीच बोलायला पाहिजे ते म्हणजे गंगापूर तालुक्याच्या पदरात परमेश्वराने वैष्णवीरूपी 'अनमोल रत्न'च टाकले असे मला तरी वाटते.

vaishanavi Manal