कवियित्री पूनम सुलाने यांना "कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती" 2021 कविरत्न पुरस्कार प्राप्त

पुनम सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात त्या नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

कवियित्री पूनम सुलाने यांना

कवियित्री पूनम सुलाने यांची कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्यातर्फे कविरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुनम सुलाने ह्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद मधील गोकुळवाडी या छोट्याशा गावातल्या असून सध्या राहण्याचे ठिकाण हैदराबाद आहे. पुनम सुलाने यांची साहित्य क्षेत्रातील ओळख आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून देशातील अनेक राज्यातील प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात तसेच USA च्या साप्ताहिक पत्रिकेतून देखील त्यांच्या या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहे.

poonam-sulaneकवियित्री पुनम सुलाने

पुनम सुलाने यांना आतापर्यंत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त असून त्यापैकी 2021 मध्ये विक्रमशिला हिंदी विद्यापीठ गांधिनगर भागलपुर (बिहार) प्रादेशिक शाखा महाराष्ट्र यांच्यातर्फे हिंदी साहित्यात विशेष कामगिरीबद्दल कविरत्न या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. हिंदी प्रमाणे मराठी साहित्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूनम सुलाने यांना मराठी साहित्याचा देखील कवीरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांची चर्चा होत आहे.

पुनम सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात त्या नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडिया वरती त्यांच्या हिंदी मराठी कविता, लेख, चारोळी यांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद नेहमीच मिळत असतो. कविरत्न पुरस्काराची निवड झाल्याबद्दल सा क व्य विकास मंच, बोल मराठी वेबसाइट ,कलम के सिपाई, चर्चागण हैदराबाद, साहित्य कस्तुरी, श्री साई प्रतिष्ठान पुणे, आणि न्याय देणारा संवाद या समुहावरील अनेक मान्यवर साहित्यिकांनी, तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी पुनम सुलाने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.