आपल्या गुरूवर नितांत श्रद्धा असणारी कवयित्री : सारिका टेकाळे

खरं सांगायचं झालं तर चूल आणि मूल या अनिष्ट रूढींच्या विळख्यात सापडलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांविषयी त्यांच्या मनात अतोनात प्रेम दिसून येते.

आपल्या गुरूवर नितांत श्रद्धा असणारी कवयित्री : सारिका टेकाळे

जे समाजात दिसतं, घडतं. ज्याचा आपण अनुभव घेतो, जे वाईट असतं. आणि तेच लेखणीच्या माध्यमातून गद्य किंवा पद्य स्वरूपात कागदावर उतरवलं जातं. त्याला जातीवंत साहित्यिकांचे साहित्य असे म्हणतात. मी समाजात अनेक लोकं पाहतो, ते आपल्या हिशोबाने लिहितात. काहीचं लिहणं तर राखीव असतं. त्यांना आपण हंगामात मातलेले साहित्यिक असे म्हटल्या जाते. जे सत्य आहे तेच कागदावर उतरविणाऱ्या साहित्यिकांमध्ये कवयित्री सारिका टेकाळे यांचे नाव आदराने घेतले जाते.

मुळच्या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील असणाऱ्या कवयित्री सारिका टेकाळे यांचा आणि माझा परिचय तसा २०१८ पासूनचा आहे. त्यांचा मुळ व्यवसाय मेकअप , मेहंदी डिझायनर हा आहे. परंतू साहित्यक्षेत्रात त्यांनी चांगलीच मजल मारलेली दिसते. त्यांच्या लेखनातून स्त्री-जीवनाच्या समस्या, समाजातील गरीबी, वाढती बेरोजगारी, दुःख, वेदना, विद्रोह, जिव्हाळा हे विषय प्रामुख्याने दिसून येतात.

प्रामाणिकपणा काय असतो? हे सारिका टेकाळे यांच्या व्यक्तीत्वाहून सिध्द होते. ज्या माणसामुळे / गुरूमुळे आपण साहित्यक्षेत्रात पुढे गेलो. त्या गुरूविषयी मनात प्रचंड पवित्र भाव त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतो. एक गुरु आपल्या शिष्याला त्याच्या बरोबरच पुढे घेऊन जात असतो. जीवन कसं जगावं? प्रामाणिकपणा कसा असावा? साहित्य कसं असावं? हे मी माझ्या गुरु साहित्यिकाकडून शिकले, आणि माझ्या जीवनात उतरविले. असे त्या बोलतांना नेहमीच गुरूची आठवण काढत सांगतात.

खरं सांगायचं झालं तर "चूल आणि मूल" या अनिष्ट रूढींच्या विळख्यात सापडलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांविषयी त्यांच्या मनात अतोनात प्रेम दिसून येते. कारण ती चूल आणि मूल यांची जबाबदारी पार पाडत उच्च स्थान गाठू शकते, असा आत्मविश्वास त्यांच्या लिखाणातून पहावयास मिळतो.

baba channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर