४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात 'कृषिका' व 'कृता'चे प्रकाशन

मराठवाडा साहित्य परिषदेचे लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडले.

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात 'कृषिका' व 'कृता'चे प्रकाशन

मराठवाडा साहित्य परिषदेचे लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडले. दिनांक२५ व २६ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री तथा विद्यमान बांधकाम मंत्री ना. श्री. अशोकराव चव्हाण, प्रमुख उपस्थिती पार पडले. तसेच संमेलनात प्रसिद्ध कादंबरीकार व संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्या हस्ते कांचन चव्हाण-पवार लिखित "कृषिका" काव्यसंग्रह व "कृता"  चारोळी संग्रहाचे प्रकाशन पार पडले. हे दोन्हीही पुस्तके औरंगाबाद येथील वर्डलॅन्ड पब्लिसिग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संपादक बाबा चन्ने यांनी प्रकाशित केलेले आहे. 

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना. जितेंद्रजी आव्हाड, म.सा.प. चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, कुंडलिक अतकरे,   स्वागताध्यक्ष राजेश करपे, डाॅ. चेतना सोनकांबळे, बिरादार मॅडम, डाॅ. कैलास अंभूरे, राम चव्हाण, किरण सगर, गणेश मोहिते, भारती सोळुंके, यांच्यासह अनेक मान्यवर हस्ते उपस्थित होते.

कांचन चव्हाण-पवार यांच्या "कृषिका "कविता संग्रहातील कविता या ज्वलंत विषयावर आधारित असून या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा, दुष्काळ, नारीशक्ती, बलात्कार पीडित महिलांची व्यथा, कोरोना महामारी याविषयी लेखन केले आहे तसेच कविता संग्रहाची प्रास्थावना कवयित्री भारती सोळुंके यांनी लिहिलेली आहे. व चित्रा गायकवाड यांनी मुखपृष्ठ काढलेले आहे. तसेच कृता चारोळी संग्रहातील चारोळ्या या काही चित्रावरील आधारित आहेत. यात लिखित चारोळ्या विविध व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे त्यांना सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाने ही चव्हाण यांना सन्मानित केले गेले आहे. कांचन चव्हाण यांना आपल्या कृषिका काव्यसंग्रहद्वारे समाजातील वाचकाने योग्य तो बदल घडून आणावा हा आहे. तसेच प्रत्येक स्त्रीने स्वतःतील सुप्त गुण समजून त्याचा विकास करावा असा आहे. त्यांचे ज्वलंत विषयावरील लेख ही विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेले आहे. त्याचप्रमाणे वरील दोन्हीही पुस्तकाचे तांत्रिक सहाय्य सौ. प्रिती भालेराव व कु. कावेरी गायके यांनी केलेले आहे.