'मनामनातील बाबाजी'चे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात प्रकाशन

प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्याविषयी कोणाकोणाच्या मनात काय काय भावना आहे. त्या भावना काव्यरूपाने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडल्या असून आठ तासात ५६ कविता प्राप्त झाल्या होत्या. 

'मनामनातील बाबाजी'चे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात प्रकाशन

आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य व वर्डलॅन्ड पब्लिसिग हाऊस औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील श्रमिक पत्रकार भवन सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी संविधानदिनाचे औचित्य साधून मनामनातील बाबाजी या प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्यावर लिहिल्या गेलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक, मा. सनदी अधिकारी व ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख हे असणार आहे. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ तथा विचारवंत ॲड एन. डी. पाटील हे असून काव्यसंग्रहावर भाष्य जेष्ठ कवयित्री जयश्री औताडे या करणार आहे. 

प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्याविषयी कोणाकोणाच्या मनात काय काय भावना आहे. त्या भावना काव्यरूपाने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडल्या असून आठ तासात ५६ कविता प्राप्त झाल्या होत्या. 

या काव्यसंग्रहाचे संपादक अमर भुंगूर्डे हे असून सहसंपादक कावेरी गायके या आहेत. तसेच प्रसिद्ध चित्रकार शशांक पाटील यांनी अप्रतिम मुखपृष्ठ रेखाटले असून  विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष व एफेम रेडिओ पुणेरी आवाजाचे आर.जे. प्रा. जगदीश संसारे सरांनी खुप बोलकी प्रास्थावना लिहिली. तसेच मलपृष्ठाच्या रूपाने जयश्री औताडे यांनी एका पानात बाबा चन्ने यांचे चरित्रच मांडले, प्रसिध्द सिनेअभिनेत्री तथा आकाशवाणी धुळे केंद्राच्या निवेदिका पूनम बेडसे यांनी काव्यसंग्रहाचे तांत्रिक कामे सांभाळून केलेले आहेत.  विंदा वीरकर, स्नेहल जगताप, हरी दळवी यांचे मोलाचे सहकार्य पुस्तकासाठी लाभलेले आहे. 

मनामनातील बाबाजी या काव्यसंग्रहात सौ. नीताताई भामरे नाशिक, ह.भ.प. प्रा. रामकृष्ण महाराज पाटील जळगाव, सौ. वर्षा बाविस्कर कल्याण, रझिया जमादार सोलापूर, सौ. विजया शिंदे मुंबई, सौ. पल्लवी चव्हाण उस्मानाबाद, सौ. सुलोचना पाटील सांगली, कु. प्रणोती शेंडे यवतमाळ, सौ. विनया तिडके सातारा, सौ. प्रिती जिवने भंडारा, सौ. प्रांजली काळबेंडे मुंबई, सौ. कल्पना सोनवणे जळगाव, सौ. सरोज गाजरे मुंबई, कु. कोमल डिगे सोलापूर, सौ. मनीषा मालपूरे जळगाव, सौ. जया मुंडे बीड, श्री. प्रकाश महामुनी सोलापूर,  श्री. प्रकाश पिंपळकर चंद्रपूर, सौ. शितलादेवी कुलकर्णी मुंबई, श्री. मधूकर दुफारे चंद्रपूर, सौ. व्यंकनबाई चेनलवाड, सौ. पूनम बेडसे  धुळे, ॲड. अश्विनी मेहता पुणे, श्री. जयराम कराळे ठाणे, सौ. सरोजा गायकवाड लातूर, संजिवनी इंगळे बुलढाणा, सौ. छाया टिकले चंद्रपूर, सौ. निरजा आत्राम चंद्रपूर, श्री. होणाजी मेस्त्री वसई, सौ. करिष्मा डोंगरे सोलापूर, सौ. सोनाली जगताप मुंबई, सौ. पूनम सुलाने हैद्राबाद, सौ. वीणा पाठक नाशिक, ॲड. सुलभा गोगरकर अमरावती, सौ. संगिता मालेकर चंद्रपूर, श्री. रविंद्र गिमोणकर नागपूर, सौ. राधा खानझोडे नागपूर, श्री. पांडूरंग आलीम रत्नागिरी, सौ. सुनिता कुलकर्णी पुणे, सौ. रंजना बोरा नाशिक, सौ. सायली कोयंडे सिंधूदुर्ग, सौ. संगिता कांबळे रायगड, सौ. वर्षा वराडे ठाणे, ॲड. रोहिणी पराडकर कोल्हापूर, सौ. संध्या परदेशी औरंगाबाद, श्री. राजेश वऱ्हाडे अकोला, सौ. सुरेखा मैड नाशिक, सौ. निवेदिता खासनीस डोंबिवली, सौ. राजश्री सुतार पुणे, श्री. हरिचंद्र दळवी ठाणे, सौ. लोपामुद्रा शहारे नागपूर, कु. कावेरी गायके वैजापूर, सौ. सरिता भांड पैठण, कु. सोनाली रसाळ वैजापूर, डाॅ. वैष्णवी मनगटे कन्नड व सौ. करूणा शिंदे पुणे यांचा समावेश आहे.

या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य. या संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदिप चोपडे, सचिव प्रा. दिपक दळवी व संस्थेचे सर्व सदस्य यांनी केलेले आहे.

जेष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस (८९  वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)जेष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस (८९  वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)

श्री. लक्ष्मीकांत देशमुख, मा. जिल्हाधिकारी (Collector), जेष्ठ साहित्यिक तथा ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बडोदा गुजरात

श्री. लक्ष्मीकांत देशमुख, मा. जिल्हाधिकारी (Collector), जेष्ठ साहित्यिक तथा ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बडोदा गुजरात

ॲड. एन. डी. पाटील ( जेष्ठ विधिज्ञ तथा विचारवंत, पुणे.)   

ॲड. एन. डी. पाटील ( जेष्ठ विधिज्ञ तथा विचारवंत, पुणे.)

श्रीमती. जयश्री औताडे ( जेष्ठ कवयित्री, आदर्श शिक्षिका तथा स्तंभलेखिका गंगाखेड, जि. परभणी)

श्रीमती. जयश्री औताडे ( जेष्ठ कवयित्री, आदर्श शिक्षिका तथा स्तंभलेखिका गंगाखेड, जि. परभणी)

बाबा चन्ने ( ग्रामीण साहित्यिक संपादक, विचारवंत)

बाबा चन्ने ( ग्रामीण साहित्यिक संपादक, विचारवंत)

अमर भुंगूर्डे (संपादक)

अमर भुंगूर्डे (संपादक)

कावेरी गायके (सहसंपादक)

कावेरी गायके (सहसंपादक)