जालना: कवयित्री पुनम सुलाने सिंगल यांचा 'ऋतुस्पर्श' हा काव्यसंग्रह साहित्यसंपदा प्रकाशन, पेन यांच्याद्वारे प्रकाशित झाला. कवयित्री पूनम सुलाने ह्या जालना जिल्ह्यातील गोकुळवाडी या छोट्याशा गावातील असून त्यांचे सध्या वास्तव्य जालंधर,पंजाब या राज्यात आहे. पुनम सुलाने यांनी मराठीतून एम,ए,बी.एड केलेले असून,हिंदी,मराठी लेख,कविता,कथा लेखिका,कवयित्री म्हणून त्यांची ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ भारतातील अनेक राज्यामध्ये त्यांनी निर्माण केली आहे, कारण फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर राज्यातील वर्तमानपत्रासाठी त्या नेहमी लेखन करत असतात. त्याचप्रमाणे दिवाळी अंक,साप्ताहिक, मासिक पत्रिका तसेच अनेक वेबसाईट वरती सतत आपले लेखन करणाऱ्या कवयित्री पुनम सुलाने यांच्या साहित्याला वाचकांकडून नेहमीच प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो.
एखादे पुस्तक म्हटले की, लेखकाच्या विचारातून समाज परिवर्तनासाठी तयार केलेले एक छोटेसे बीज असते, आणि ह्या पुस्तक रुपी बियाचे योग्य विचाररुपी वृक्षात परिवर्तन होण्यासाठी आवश्यकता असते ती योग्य वाचकांची,... एखादे चांगले पुस्तक लिहिणे समाज परिवर्तनासाठी जितके जास्त गरजेचे आहे त्याहीपेक्षा ते पुस्तक योग्य वाचकाच्या हातापर्यंत पोहोचवणे देखील तितकेच जबाबदारीचे आणि महत्त्वपूर्ण कार्य असते. म्हणूनच, जीवन कसं जगावं, प्रेम म्हणजे काय, आत्मविश्वासाचे महत्त्व,जीवनातील भक्तीचे महत्त्व, निसर्गाकडून जगण्याची कला, सकारात्मक विचार कशी आत्मसात करता येईल, अशा आपल्या अनेक प्रश्नांचे उत्तर ऋतुस्पर्श हा काव्यसंग्रह वाचताना आपल्याला नक्कीच मिळतील...
कवयित्री पूनम सुलाने-सिंगल यांचा पहिला मराठी काव्यसंग्रह 'ऋतुस्पर्श' या काव्य संग्रहाचा लोकार्पण दि.16 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोकुळवाडी ता.जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी डॉ.सुरेखाताई लहाणे जाफराबाद नगराध्यक्षा तसेच शिक्षक श्री सुखदेव अवकाळे सर जि. प. माहोरा यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव सरोदे यांनी केले.
पाचशे पेक्षाही कमी लोकसंख्या असून देखील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाचा पाया रचून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याची तयारी करून या गावातील अनेक विद्यार्थी आज शिक्षक, सैन्यदल, पोलीस अधिकारी, महसूल विभाग, जिल्हा परिषदच्या क्लास वन क्लास टू च्या पदावर कार्यरत आहेत. अशा या छोट्याशा गावात कवयित्री सौ.पुनम सुलाने यांचे देखील प्राथमिक शिक्षण झालेले असून आज देशातील तसेच देशाबाहेरील वर्तमानपत्रासाठी त्या लिहितात त्यांची ओळख ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून देशातील अनेक राज्यातून निघणाऱ्या वर्तमानपत्रात नेहमी त्यांचे लेख आणी कविता छापुन येत असतात अशा नावलौकीक कवयित्री सौ. पुनम सुलाने यांच्या पहिल्या मराठी काव्यसंग्रहाचे (पुस्तकाचे) प्रकाशन साहित्यसंपदा प्रकाशनाद्वारे गोकुळवाडी या त्यांच्या जन्मभूमीत झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जाफराबाद नगराध्यक्षा डॉ.सुरेखाताई लहाने, जिल्हा परिषद माहोरा चे शिक्षक श्री सुखदेव अवकाळे, जिल्हा परिषद शाळा जाफराबादचे मुख्याध्यापक श्री उमेश दुनगहू, ज्ञानसागर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री निवृत्ती दिवटे, राजे संभाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास टाले, न्यू हायस्कूल जाफराबादचे मुख्याध्यापक श्री बोरकर, प्रसिद्ध उद्योजक श्री संजय राजपूत, पैठण तालुका भाजपा पदाधिकारी श्री गजानंद बोहरा, तहसीलदार रवी सतवन, सैन्य अधिकारी संजीव सिंगल,लघुलेखक जिल्हा परिषद बुलढाणा बदामसिंग सतवन,प्रतापसिंग सुलाने (STI) जितेंद्रसिंग (STI), भगतसिंग दुलत (PSI), चरणसिंग दूलत(तलाठी) चैनसिंग सुलाने,कृषी अधिकारी, मुख्याध्यापक मनोज मुरकुटे, सहशिक्षक अनंता जंजाळ वाडी परदेशी, सह्याद्री अर्बन बँक माहोराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री कैलास देशमुख, आरतखेडा-गोकुळवाडी चे सरपंच श्री शिवाजी भिसे,जाफराबाद साहित्य चळवळ समूहाचे सदस्य तसेच शासकीय कर्मचारी, मित्र मंडळ,प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
संभाजीनगर, धुळे,अमरावती, नागपूर, बुलढाणा, जालना, नाशिक, मुंबई, पुणे,रायगड, सांगली, सातारा, अहमदनगर, नांदेड, ठाणे, वासिम, गुलबर्गा( राज्य: कर्नाटक), महाराष्ट्रातील अशा अनेक जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यातील प्रकाशन पूर्व बुकिंग झालेल्या 80 काव्यसंग्रहाच्या प्रती पोस्टाने पंजाब येथून पाठवण्यात येत आहे.
सर्व पुस्तके पोस्टाने पाठवली जाणार आहे,
आपल्यापैकी कोणाला काव्यसंग्रह हवा असल्यास संपूर्ण तपशीलासह 7568156265 ह्या नंबर वर संपर्क करावा