न्याय देणारा संवाद समुहातर्फे कथा लेखन स्पर्धा

न्याय देणारा संवाद या समूहामध्ये आदरणीय बाबा चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली 'लोप पावत चाललेली माणुसकीʼ या विषयावर दिनांक. शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ सकाळी १०:०० वाजेपासून ते रविवार २९/०८/२०२१ रोजी रात्री १०:०० वाजेपर्यंत 'कथा लेखन स्पर्धाʼ आयोजित

न्याय देणारा संवाद समुहातर्फे कथा लेखन स्पर्धा

न्याय देणारा संवाद समुहातर्फे नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या विषयांना नेहमीच वाचा फोडली जाते. मागील महिन्यात इतिहास जमा झालेल्या पत्रलेखनाला समुहामार्फत स्पर्धा घेऊन नवसंजीवनी देण्यात आली.

तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो. ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. की पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. आज घडणाऱ्या विविध घटनांमध्ये अतिशय असंवेदनशील, स्वार्थी, लंपट, वासनांध माणसे आपल्याला दिसतात. ज्यांच्याबद्दल आपण शब्दात वर्णन करू शकत नाहीत. 

म्हणूनच या विषयाला वाचा फोडण्यासाठी न्याय देणारा संवाद या समूहामध्ये आदरणीय बाबा चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली 'लोप पावत चाललेली माणुसकीʼ या विषयावर दिनांक. शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ सकाळी १०:०० वाजेपासून ते रविवार २९/०८/२०२१ रोजी रात्री १०:०० वाजेपर्यंत 'कथा लेखन स्पर्धाʼ आयोजित केली असून स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्या. सौ. कल्पना रविंद्र बनसोड, (संचालक : बनसोड एज्युकेशन इन्स्टिट्यूट, औरंगाबाद.) या काम पाहणार आहे. अशी माहीती समुहाच्या संस्थापक सदस्या कावेरी गायके यांनी दिली.

तुम्हीही या स्पर्धे मध्ये भाग घेऊ शकता तुमच्या कथा तुम्ही ९६६५६३६३०३ ( बाबासाहेब चन्ने ) या Whatsapp no वर किंवा  babachanne86@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवू शकता.