आजची जिजाऊ लेखसंग्रह आधुनिक आईसाठी संस्कारपीठच...

बदलत्या काळात आपण आपले संस्कार आणि संस्कृती दोन्ही विसरत चाललो आहोत. जन्मतः जर मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला तर त्याच्या भविष्याबद्दल खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत होतील.

आजची जिजाऊ लेखसंग्रह आधुनिक आईसाठी संस्कारपीठच...

आजची जिजाऊ शिवबा का निर्माण करू शकत नाही? हे पुस्तक म्हणजे आजच्या आईच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की आपण खरचं कुठेतरी चुकतोय, जर जिजाऊला शिवबा निर्माण करायचा असेल तर तिने आधी जिजाऊ व्हायला हवं. 
          
बदलत्या काळात आपण आपले संस्कार आणि संस्कृती दोन्ही विसरत चाललो आहोत. जन्मतः जर मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला तर त्याच्या भविष्याबद्दल खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत होतील. हिंदवी स्वराज्य व्हावे ही इच्छा जिजाऊ आईसाहेबांची होती. ती पूर्ण करण्यासाठी भविष्यापुढचा विचार शिवबा गर्भामध्ये असतांना मातोश्री जिजाऊंनी केला होता. बदलत चाललेला काळ त्याप्रमाणे होणारे बदल लक्षात घेता आजच्या जिजाऊबद्दल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. पुस्तकाच्या अगदी नावाप्रमाणे आजची जिजाऊ शिवबा का निर्माण करू शकत नाही? याचे उत्तर प्रत्येक लेखामधून मिळतं. जिजाऊ असो वा शिवबा ते कसे असावे आणि कसे आहेत, हे पुस्तकात अगदी परखडपणे मांडलेलं दिसून येतंय. काही लेखांमध्ये तर लेखिकांना मनापासून वाटणारी तळमळ किती तीव्र आहे याचं दर्शन घडलं. 
           
मला सांगण्यास अभिमान वाटतो की, प्रत्येक लेख हा महिलेने लिहिला असून देखील आजच्या युगात आईने खरच काय घडवायला हवं हे सांगितलं आहे. शिक्षणासोबत संस्कारदेखील किती महत्त्वाचे आहेत, त्या संस्कारांना आईच्या मायेची आणि प्रेमाची देखील किती गरज आहे हे पुस्तक वाचतांना दिसून येतं. एका लेखामध्ये तर अनेक प्रश्नांची यादीचं समोर आलेली दिसून आली. तो राग आणि ती तीव्र इच्छा एक बाई व्यक्त करू शकते याचा मात्र मला अभिमान वाटतो. मुळात अशा एका ज्वलंत आणि गरज असणाऱ्या विषयावर लेखानाची स्पर्धा 'न्याय देणारा परिवारात घ्यावी, ही संकल्पना मुळात किती सुपिक मेंदूतून असावी. म्हणून ग्रामीण साहित्यिक बाबासाहेब चन्ने सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मी तर म्हणेल या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी एका स्त्रीमधील स्त्रीत्वाला जणू काही आव्हान केलं असावं? प्रत्येक लेखामध्ये कालची जिजाऊ आणि आजची जिजाऊ यामधील फरक दिसून येतो. मी तर म्हणेल या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वाचकांच्या डोळयात अंजन घातलं आहे. लहान थोर सर्वांनी वाचून त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी कदाचित हे पुस्तक आहे. समाजातील ज्वलंत विषयावर सत्य लेखन करणं हा लेखकाचा धर्म असतो. तो तंतोंतत माझ्यासह प्रत्येक लेखिकेने पाळला असेच मी म्हणेल. काही टीकात्मक लेखन असले तरी अगदी मनापासून विचार करायला लावणारे लेखन आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतं. 
           
प्रश्न-प्रतिप्रश्न यांची सुंदर मालिका तसेच काळाची गरज संस्कारांची शिदोरी जपण्याची गरज, आपला इतिहास म्हणजेच अनमोल ठेवा जतन करण्याची आवश्यकता अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश पडलेला दिसून येतो. सर्व वाचकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी म्हणावी लागेल. आजची जिजाऊ शिवबा का निर्माण करू शकत नाही? हे पुस्तक म्हणजे सुंदर विचारांची एक सुंदर श्रृंखला आहे. असे मी म्हणेल.
             
आजची जिजाऊ निर्माण का करू शकत नाही? ही स्पर्धा नसून खरं पाहता जणू काही आम्हां सर्व साहित्यिकांना मिळालेलं एक आव्हानच होतं. आम्हां सर्वांच्या लाडक्या औरंगाबादच्या डिप्युटी कलेक्टर तथा मराठवाडा महसूल प्रबोदिनीच्या संचालक आदरणीय सौ. अंजली धानोरकर मॅडम यांनी अगदी निपक्षपातीपणे सुंदर परीक्षण केले. तसेच पुस्तक निर्माण होण्यामागे अनेक जणांचे हात आहेत. औरंगाबादच्या तहसीलदार श्रीमती. ज्योती पवार मॅडम यांनी पुस्तकाची प्रस्तावना अतिशय मार्मिक भाषेमध्ये लिहिली आहे. तसेच अतिशय मोजक्या आणि नेमक्या शब्दात मनोगत आमच्या सर्वांच्या लाडक्या तथा बाबासाहेब चन्ने सरांच्या कन्या प्रसिद्ध कवयित्री, पुस्तकाच्या सहसंपादिका कु. कावेरी गायके यांनी लिहिले. पुस्तकाच्या संपादिका सौ. प्रियंका अमृतकर मॅडमने सर्वांचे लेख एकत्र करण्यापासून ते पुस्तक तयार होईपर्यंत खूप मेहनत घेतली. मला सांगायला नक्कीच आवडेल की, आमचे सर्वांचे लाडके सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यिक बाबासाहेब चन्ने सरांचे वेळोवेळी आम्हां सर्वांना मोलाचे सहकार्य मिळाले. सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. असे म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण मी म्हणेल एका यशस्वी स्त्रीमागे नक्कीच एका पुरूषाचा हात असतो. कारण स्त्रीमुक्तीचा लढा असो, विधवा पुर्नविवाहासाठी लढा असो, महिलांच्या शिक्षणांची सुरूवात असो, महिलांच्या संरक्षणासाठी कायदे बनविण्याची प्रक्रिया असो किंवा महिलेच्या संरक्षणाचा प्रश्न असो, या सर्वांसाठी पुरूषांनीच पुढाकार घेतलेला आपलेला दिसतो, त्यात प्रामुख्याने महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजाराम मोहनराॅय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे डोळ्यासमोर येतात. आजही या महापुरूषाचा वारसा चालवणारे अनेक जन आहेत. फक्त आज आपली चुकी एकच होते, आमच्या आदरणीय सौ. दुर्गा देशमाने-राऊत मॅडम म्हणतात, 'आपण फक्त रावणच शोधतो, राम मात्र नजरेआडच राहतो.' असच प्रत्येकाच्या जीवनात घडताना दिसतंय, मला सांगायला नक्कीच खूप आवडेल की, आमचे सर्वांचे लाडके सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यिक बाबासाहेब चन्ने यांचे वेळोवेळी आम्हां सर्वांना मोलाचे सहकार्य मिळत असते. सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. बाबासाहेब चन्ने सर नक्कीच वरील महापुरूषांचा वारसा चालवतात. असे मला मनापासून वाटते, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज शेकडो हात लिहिते होऊन दैनिकांच्या संपादकीय पानापर्यंत आलेले आहेत. त्यातीलच मी पण एक आहे. याचा मनस्वी आनंद आहे. जात-पात, धर्म-पंत, रंग-रूप यापलीकडे बघण्याचा त्यांचा निस्वार्थी दृष्टीकोण आहे. 

आजची जिजाऊ शिवबा निर्माण का करू शकत नाही? या स्पर्धेच्या आयोजक तथा धुळे आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका व प्रसिद्ध अभिनय संम्राज्ञी सौ. पूनम बेडसे मॅडम तर 
म्हटल्या हे पुस्तक म्हणजे आधुनिक जिजाऊंसाठी संस्कारपीठच आहे. तसेच पुस्तकाचे मुद्रितशोधन सौ. शिल्पा पूनीत सिन्हा यांनी केले असून पुस्तकाची मुखपृष्ठ संकल्पना सौ. मनिषा बैनाडे यांची आहे. तसेच पुस्तकासाठी तांत्रिक सहाय्य सौ. कविता मगर व कु. रोहिणी मोरे यांनी केले. मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथील वकील संघाच्या मा. सह-सचिव ॲड. शुभांगी मोरे पाटील यांनी आवर्जून आम्हा सर्वांवर कौतुकाचा वर्षाव केला. पुस्तकाच्या संपादक म्हणून आदरणीय सौ. प्रियांका अमृतकर मॅडम तसेच कु. कावेरी गायके मॅडम यांची बहुमोल साथ सर्वांना लाभली. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने सौ. प्रियंका अमृतकर, सौ. मीना राजपूत, कु. मयुरी खानविलकर, श्रीमती. अनुराधा मोतेवार, कु. कोमल डिगे, कु. कावेरी गायके, श्रीमती. जयश्री औताडे, श्रीमती. जयश्री जगताप, मी स्वत: सौ. प्रीती भालेराव, सौ. पल्लवी पवार, सौ शलाका कुळकर्णी, सौ. वृषाली पाटील, सौ. मनीषा कांदळकर, सौ. शिल्पा सिन्हा, सौ. संजीवनी इंगळे, सौ. मनीषा महेर या सर्वांचे उत्तम विचार आपल्याला वाचायला मिळतील. मी तर म्हणेल की या सर्व चौदा जणींनी मिळून जणू काही सोळा पुष्पांची सुगंधी माळ जिजाऊ आईसाहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. आजची जिजाऊ नेमकी कशी आहे, आणि कशी हवी हे सांगताना आमच्या जिजाऊदेखील परखड शब्दांत व्यक्त झाल्या आहेत. आजची जिजाऊ काळाप्रमाणे बदलत गेलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे अशा विचारांची पुस्तकं वाचणं ही मात्र काळाची गरज आहे असेच मला वाटते. 

Priti Suraj-bhalerao

 सौ. प्रिती सुरज भालेराव, 
 हडपसर, पुणे.