सुप्रसिद्ध कवयित्री प्रिती भालेराव हे नाव गुगल सर्चिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर

कवयित्री प्रिती भालेराव यांच्या कविता, कथा, लेख, पत्र वाचण्यासाठी वाचक त्यांचे नाव गुगलवर सर्च करतात. त्यामुळे गुगल सर्चिंगमध्ये त्यांचे नाव 'बोल मराठी'च्या वेबसाईटवर जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

सुप्रसिद्ध कवयित्री प्रिती भालेराव हे नाव गुगल सर्चिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर

सुप्रसिद्ध कवयित्री प्रिती भालेराव या पुणे शहरात वास्तव्यास असून त्यांनी अलिकडेच साहित्य क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. त्या आध्यामिक वृत्तीच्या असून विठ्ठलावर त्यांची निस्सीम भक्ती आहे. त्यांनी विठ्ठलावर अनेक कविता लिहिलेल्या आहे. तसेच त्यांनी विविध विषयांवर शेकडो कविता, लेख व कथा लिहिलेल्या आहे. भालेराव मॅडम या दैनिक ग्लोबल भारतच्या लेखिका आहेत. त्यांच्या विविध कविता, कथा, लेख व पत्र दैनिक ग्लोबल भारतने प्रसिद्ध केलेले आहे. तसेच त्या 'बोल मराठी' या वेबसाईटवरही लेखन करत असतात. त्यामुळे त्यांचे अगणित ऑनलाईन वाचक देखील आहेत. 

कवयित्री प्रिती भालेराव यांच्या कविता, कथा, लेख, पत्र वाचण्यासाठी वाचक त्यांचे नाव गुगलवर सर्च करतात. त्यामुळे गुगल सर्चिंगमध्ये त्यांचे नाव 'बोल मराठी'च्या वेबसाईटवर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. Priti bhalerao bol marathi हे नाव गुगलवर टाईप केले की, पहिल्याच क्रमांकावर प्रिती भालेराव मॅडमचे फोटो येतात. त्यानंतर कविता, लेख, कथा या लगेच दिसतात. ही साईट जगातील कुठल्याही देशात उपलब्ध आहे. आणि प्रिती भालेराव हे नाव ऑनलाईन लेखकांच्या यादीत जगात सध्या तरी पहिल्याच क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रिती भालेराव या आपल्या लेखनाचे श्रेय पती सुरज भालेराव, वडील हनुमंत भागवत कुंभार व आई आशाबाई हनुमंत कुंभार यांना देतात. 

कवयित्री प्रिती भालेराव 'न्याय देणारा संवाद' या साहित्य समुहाच्या सदस्या असून त्यांना ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने, जेष्ठ कवयित्री जयश्री औताडे, सुरेखा पाटील, पूनम बेडसे, कावेरी गायके, पूनम सुलाने, कोमल डिगे, स्नेहल जगताप, स्वाती जाधव, वंदना पेंडकर, जयश्री जगताप, पल्लवी पवार, कांचन पवार यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.