शिफ्टची नोकरी करता तेव्हा..

कंपनी, कारखाने यामध्ये काम करणायाचं दिवसभराचं वेळापत्रक हे कामाच्या शिफ्टवर अवलंबून असतं. त्यांचं खाणं-पिणं आणि झोपणं हे सर्व त्यांची कामाची शिफ्टच ठरवते.

शिफ्टची नोकरी  करता तेव्हा..

कंपनी, कारखाने यामध्ये काम करणायाचं दिवसभराचं वेळापत्रक हे कामाच्या शिफ्टवर अवलंबून असतं. त्यांचं खाणं-पिणं आणि झोपणं हे सर्व त्यांची कामाची शिफ्टच ठरवते. इतर ठिकाणी काम करणार्या लोकांपेक्षा, कंपनी आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर शारीरिक आणि मानसिक ताण खूप असतो. श्रमाची कामही खूप असतात. अशा परिस्थितीत त्यांनी जर आपल्या आहाराचा नीट विचार केला नाही तर मात्र आहार हा आधार ठरण्याऐवजी त्यांच्या शारीरिक व्याधीच मूळ ठरू शकतो.

श्रम फार? आहार सांभाळा...

श्रमाची कामं करणाऱ्यांच्या आहाराचं स्वरूप हे बहुदा कोरडे, उष्ण आणि तीक्ष्ण असतं. अनेकांच्या आहारात भाकरी ठेचा कोरडी भाजीच प्रामुख्यानं आढळते. उसळींचं प्रमाणही खूप असतं त्यामुळे शरीरातील रूक्षता वाढते.

८.३० ते ५ या वेळेत काम करणार्या व्यक्तींचा विचार केला तर अनेक ठिकाणी सकाळी गेल्यावरच न्याहारीची सोय असते. यात प्रामुख्यानं वडा, समोसा असे पदार्थ असले तरी अनेकदा केळ दूध बिस्कीट असे पदार्थही असतात. रोज राज वडा-समोसा खाण्यापेक्षा या पर्यायी पदार्थाचा समावेश अवश्य करावा. अन्यथा राजगिरा लाडू वडी या सारखे पौष्टिक, स्वस्त आणि टिकाऊ पदार्थ जवळ ठेवावेत.

शारीरिक श्रम भरपूर असल्यानं रोज घरून निघताना एक कपभर दूध घ्यावं. सोबत च्यवनप्राश किंवा अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण, अशी बलदायक मिश्रणही घ्यावीत.

पोळी-भाजी असा जेवणाचा डबा घरूनच न्यावा. सोबत कॅटिनमधून सॅलेड, ताक, वरण-भात असे पदार्थ घ्यावे म्हणजे संपूर्ण जेवणाचा आनंद मिळतो.

पोटाला तडस लागेल, नंतर काम करता येणार नाही इतकं जेवण करू नये.

नेहमीच्या आहारात दूध, तूप, लोणी, खवा, हरभरा, उडीद, तीळ, शेंगदाणा, करडई यासारखे स्निग्ध पदार्थ यांचा समावेश करावा. तेलबिया, शेंगदाणे, तीळ, खोबरे चटणीच्या स्वरूपातही नित्य आहारात ठेवता येतील. त्याचबरोबर शिंगाडापीठ, राजगीरा पीठ, खीर किंवा शिरा या स्वरूपात अधूनमधून घ्याव.

ज्यारी, बाजरी, कुळीथ यासारखी रुक्ष धान्यं कमी प्रमाणात वापरावी, अन्यथा तुपासह घ्यावीत, ज्वारी व काळे उडीद म्हणजे कळण्याची भाकरी मात्र उडदामुळे रूक्ष होत नाही म्हणून ती खाण्यास हरकत नाही तीळ लावून भाकरी खावी. अतिश्रमाची कामं करणाऱ्यांनी तेलाचा थोड़ा अतिरिक्त वापर केल्यास चालतं.

शिफ्ट क्यूटीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जेवणाचे, झोपेचे वेळापत्रक सारखं बदलतं. अशावेळी घरीसुद्धा कंपनीप्रमाणेच जेवणाच्या वेळा ठरवाव्यात म्हणजे सकाळचं जेवण ११ वा. आणि रात्रीचं जेवण सायं. ७ वाजता म्हणजे कोणतीही क्यूटी असली तरी जेवणाची वेळ मात्र तीच राहते.

ज्यावेळी रात्रपाळी असेल तेव्हा रात्री जेवढं जागरण होईल त्याच्या अर्धवेळ झोप दुसर्या दिवशी घ्यावी. उदा. रात्री ४ तास जागरण झालं तर दिवसा २ तासांची झोप पुरेशी असते व ही झोप भोजनापूर्वी घ्यावी. उदा. ११.३० वाजता क्यूटी असेल तर सकाळी ८ ते ११ व रात्री अशी

विभपन घ्यावी.

रात्रीच्या जागरणाने रूक्षता वाढते म्हणून या काळात दूध आणि तूप एकत्र घ्यावे किया मनुका आणि दूध घ्यावे.