आपण सर्वांनी देवमाणूस हा शब्द ऐकला असेलच, या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा देव माणूस मला भेटला

बाबासाहेब माझे खूप मोठे मार्गदर्शक आहेत. ज्याप्रमाणे कुंभार चिखलाच्या गोळ्यापासून एक सुंदर मूर्ती तयार करतो, तिला घडवतो, त्याचप्रमाणे सरांनी मला घडवले अर्थातच मार्गदर्शक म्हटल्यावर जिथे जिथे चुकतं तिथे तिथे योग्य मार्गदर्शन केले.

आपण सर्वांनी देवमाणूस हा शब्द ऐकला असेलच, या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा देव माणूस मला भेटला

"बाबा चन्ने" सिर्फ नाम ही काफी हैं! आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती येतात पण त्यातून काहीच आपली बनून राहतात. 'न्याय देणारा संवाद' या एका ग्रुपवर झालेली ओळख नव्याने एका नात्यात बांधल्या गेली. माझ्या आयुष्याला नव्याने आकार देणारे बाबा चन्ने सर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास मी पात्र नाही. परंतु माझा हा छोटासा प्रयत्न.

Baba Channe

बाबा चन्ने (साहित्यिक)

हो! बाबासाहेब माझे खूप मोठे मार्गदर्शक आहेत. ज्याप्रमाणे कुंभार चिखलाच्या गोळ्यापासून एक सुंदर मूर्ती तयार करतो, तिला घडवतो, त्याचप्रमाणे सरांनी मला घडवले अर्थातच मार्गदर्शक म्हटल्यावर जिथे जिथे चुकतं तिथे तिथे योग्य मार्गदर्शन केले.

तुम्ही चारोळ्या उत्कृष्ट करता, किती सुंदर काव्य रचना, अगदी वास्तव मांडले, हे आणि असे मोठे मोठे दाखले सर मला नेहमी देतात. बाबासाहेबांचे साहित्यक्षेत्रात खूप मोठं नाव आहे. त्यांच्या नावातच खूप मोठी ताकत आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण साहित्यिक, उत्कृष्ट कवी म्हणून त्यांची महाराष्ट्रभर खूप मोठी ओळख आहे. त्यांचे खुप मोठमोठ्या साहित्यिकांशी जिव्हाळाचे संबंध आहे. ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे, फ.मुं. शिंदे, जेष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, ना. वि. पटारे, रानखळगीकार डाॅ. भीमराव वाघचौरे, उत्तम बावस्कर, गीतलेखक डाॅ. दासू वैद्य, मराठी सिनेसृष्टीत सर्वात प्रसिद्ध गीते ज्यांनी लिहिली ते गुरू ठाकूर, प्रसिद्ध मानशास्त्राज्ञ राधेश्याम गोमला असे कित्येक साहित्यिकांना, लेखकांना, गीतकारांना आपण फक्त टीव्हीवर पाहतो. त्यांच्याबाबत सरांचे खुप जिव्हाळाचे संबंध आहेत. सुंदर सुंदर काव्य लिहिणे, उत्कृष्ट स्तंभलेख लिहिणे हा त्यांचा जणू छंदच आहे. एवढं सगळं असूनही त्यांचे राहणीमान अगदी साधे आणि सरळ आहे. कुठलाही मोठेपणा त्यांच्या अंगी नाही.

हार न मानता जिद्दीने लढायच आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्ट साध्य करायची ही अनमोल शिकवण मला मिळाली. कायम प्रोत्साहन देणे आणि चूक बरोबर हे योग्य प्रकारे समजावून सांगणे, प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगणे, माझ्या लिखाणातील प्रत्येक अडचण दुर करणे, वेळोवेळी माझ्या लिखाणाला चालना देणे अशी प्रेरणा वारंवार सरांकडून मिळते. 

माझ्या आयुष्यात बाबा सरांच्या येण्याने
लिखाणाची प्रेरणा मिळाली मला नव्याने

अहो! दिसण्यावर माणसाचं काहीच नसतं तर माणसाचं कर्तुत्व सगळं काही सांगून जातं. कोणत्याही लेखकाने अचूकपणे एखादा विषय जर वाचकांच्या समोर मांडला तर तो त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो असे सर नेहेमी सांगतात. चारोळ्या असो काव्य असो अथवा लेख भावना महत्त्वाच्या असतात. त्या वाचकांना समजल्या पाहिजेत असे ते वारंवार सांगतात. 

एवढे मोठे साहित्यिक, कवी, लेखक, समिक्षक असणारे सर त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा उत्कृष्ट लेख लिहून ज्या आशीर्वादरुपी शुभेच्छा त्यांनी मला दिल्या त्या अनमोल आहेत, त्यांची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. म्हणूनच मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. 

 सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे