रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध 2 विकेट राखीसह इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या मोहिमेस प्रारंभ केला.
मुंबई इंडियन्स पथक:
रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, नॅथन कूटर-नाईल, अॅडम मिलणे, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन आणि अर्जुन तेंडुलकर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पथक:
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पादक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, अॅडम झांपा, केन रिचर्डसन, काईल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, आणि कोना श्रीकर भारत.
RCB ने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला , आणि हा निर्णय योग्यच ठरला चहल ने चौथ्या ओव्हर मध्ये रोहित शर्मा ला रनआऊट करून रोहित ची विकेट घेतली त्यामुळे मुंबई इंडियन टीम वर दबाव निर्माण झाला . या दरम्यान इशांत किशन , ख्रिस लेन आणि सूर्याकुमार यादव यांनी मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला पण सफल झाले नाही. ख्रिस लेन ने MI साठी ४९ रन्स बनवले आणि लिन आणि सूर्यकुमार यादव यांनी 70 धावांची भागीदारी केली. पांड्या brothers आणि कायरान पोलाड यांनी काही विशेष कामगिरी केली नाही तेही असफल राहिले.
याचे सर्व श्रेय जाते ते हर्षल पटेल याला त्याने ५ विकेट घेऊन सामनावीर ठरला आणि मोहमद सिराज यांनी पण चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. यामुळे मुंबई इंडियन्स फक्त १६० रन्स चे लक्ष RCB समोर ठेऊ शकले.
RCB ने वॉशिंग्टन सुंदर आणि विराट कोळी सोबत ओपनिंग केली, वॉशिंग्टन सुंदर हा १० रन्स वर आऊट झाला आणि रजत पाटीदार हा बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीने ने ३३ रन्स व मॅक्सवेल ३९ रन बनवत सोबत चांगली खेळी खेळली. बुमराह ने विराट कोळी ची विकेट घेत सामना पुन्हा रुळावर आणला या नंतर AB डेलिव्हर्स याने ४८ रन्स बनवून पुन्हा सामना RCB च्या बाजूने आणलं आणि बुमराह च्या शेवटच्या ओव्हर मध्ये २ चौके मारले
AB डेलिव्हर्स हा शेवटच्या ओव्हर मध्ये २ बॉल मध्ये २ रन्स हवे असताना आऊट झाला. त्यानंतर सिराज याने एक रन कडून हर्षल पटेल ला strike दिली आणि हर्षल याने एक रन कडून RCB ला जिंकून दिले