दोन्ही हातानी अधू : मात्र पायाने काढलेल्या चित्राने फेडतो डोळ्याचे पारणे

मुबईतील मोहंमद शेख या युवकाची अनोखी कला : बालपणापासून अपंग , तरीही कुंचल्यात पारंगत

दोन्ही हातानी अधू : मात्र पायाने काढलेल्या चित्राने फेडतो डोळ्याचे पारणे

वर्तमानात जगत असल्याने मी कधीच निराश होत नाही अपंगत्व असूनही जीवनाशी माझा संघर्ष सुरु आहे . माझ्या पायानी मला जगायला शिकवले असून ते पायच मला नवे शिखर गाठून देतील , हे उद्गार आहेत मोहंमद नदीम शेख या २२ वर्षीय तरुणाचे . जोगेश्वरीतील त्याच्या घरी व्यक्तिचित्रे , निसर्ग फुलेंपानाची चित्रे बघताना एकाही चित्रावर नजर ठरत नाही . इतकी सुदर चित्रे बघितल्यावर ती दिन्ही हात नसलेल्या व्यक्तीने काढली आहेत आपला विश्वासच बसत नाही रंगाचा ब्रश पायाच्या बोटामध्ये लीलया पकडत नदीमने निर्माण केलेल्या रंगाच्या अनोख्या विश्वाने त्याला एक मोठ्या आर्थिक आधार मिळवून दिला आहे . वार्लीमध्ये जन्मलेल्या , यावर दीमला लहानपणापासूनच दोन्ही हात नसल्याचे बघून त्याच्या आईवडिलांना दुःख झाले . पण त्यातून ते सावरले आणि नदीमचा नीट सांभाळ केला . सातवीपर्यंत आग्रिपड्यातल्या दिव्यांग शाळेत शिकल्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण साधारण शाळेत केले इस्माईल युसूफ कॉलेजमधून त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले .


पायाच्या बोटानी चित्रे काढण्याच्या आतापर्यतच्या प्रवासाबद्दल नदीम म्हणतात कि , शाळेत अभ्यासाबरोबर नुत्य पोहणे चित्र काढणे मला आवडायचे . शाळेत इतिहासाच्या पुस्तकातील व्यक्तिचित्रे मी रेखाटली तेव्हा ती शाळेतल्या शिक्षकांना खूप आवडली . सातवीमध्ये असतानाच शिक्षकांनी इंडियन माऊथ अँड फूट पेंटर्स असोसिएशन या दिव्यगसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेशी संपर्क साधून दिला . तेव्हापासूनच मी खऱ्या अर्थाने चित्राच्या दुनियेत रमून गेलो 

व्यक्तिरेखाचित्रावर हातखंडा

ऑक्रिलिक , वॉटर पेंटींग , चारकोल या माध्यमामध्ये आतापर्यंत कितीतरी चित्रे नदीमने काढली .
व्यक्तिरेखाचित्रे हि त्याची जमेची बाजू असल्याने त्यातील विशेष शिक्षणही त्याने घेतले . नदीमच्या पायाच्या बोटानी शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे , महात्मा गांधी याच्यासह अनेक सुदर चित्रे रेखाटली आहेत . यातील काही चित्रे त्याने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे ज्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे याना भेट दिली आहेत . संस्थेचा आधार : अपंग व्यक्तींनी त्याच्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने इंडियन माऊथ अँड फूट पेंटर्स असोसिएशन ही जागतिक स्थरावरील स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे . चित्राची भेटकार्ड विविध प्रकारची चित्रे या कलाकारांकडून काढून घेऊन त्याची विक्री केली जाते . त्याबद्दल कलाकारांना ठराविक विधवेतन दिले जाते उत्पात्राचा म्हणून हो संस्था आधारस्तभ ठरली असल्याचे नदीम याने सांगितले .


आर्ट गॅलरी भरण्याचे स्वप्न

माझी व्यावसायिक चित्रकार म्हणून वाटचाल सुरु झाली आहे . पण कला कितीही शिकली तरी तुमचा अभ्यास सप्त नसतो . संघर्षाची वाटचाल सुरु ठेवायची , भविष्याच्या मागे धावायचे नाही ते आपोआप घडते असे आवर्जून सांगणाऱ्या नदीम शेखने तरुण वयातच आर्ट गॅलरी भरण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे . कलाकार -मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो - त्याची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी नियोजन करण्यास सुरुवात केली असल्याचे त्याने सांगितले