चितळे बंधू ' हे शब्द उच्चारले कि आपल्या तोंडी आपोआपच शब्द येतो 'मिठाईवाले !' पुण्यातील अनेक मराठी उद्योजकांची नावे आणि त्यांचे उद्योग यांचे घट्ट नाते त्यांच्या नावातूनच व्यक्त होते, इतके ते जनमानसात रुजलेले आहे. त्याची काही उदाहरणे म्हणजे लागू बंध मोतीवाले , गाडगीळ सराफ , सोने बंधू संतरज्यावाले , जोशी वडेवाले इत्यादी. तुम्ही या उद्योजकांची उत्पादने वापरली असोत वा नसोत. त्यांचे नाव उच्चारले कि त्यांची उत्पादने आपोआप ओठी येतातच.
गेल्या अनेक दशकांची वाटचाल आणि उच्च गुणवत्ता यामुळे तर चितळे बंधू मिठाईवाले हे नाव आता केवळ पुणे शहरात च नव्हे तर जगाच्या पाठीवर जेथे जेथे मराठी माणूस राहतो , त्या प्रत्येक भागात , देशात , सातासमुद्रापलीकडे हि पोचलेले आहे. त्यांच्या या व्यवसायाला आता पंचाहत्तराहून अधिक वर्षे झाली. त्यांच्या चार पिढ्यांचे बहुतांश सदस्य या मिठाईच्याच धंद्यात आहेत. मिठाई बनवायचे म्हणजेच हलवायचे काम करणारे चितळे घराण्यातील सगळेच सदस्य उच्चविद्याविभूषित आहेत. अनेक जण इंजिनीरिंग , संगणक शास्त्र , वकिली , डॉक्टरकी या क्षेत्रातील उच्च पदवीधारक आहेत. परंतु त्यातील कुणीही , कधीही हलवायचे काम हे हलके काम आहे असे मानीत नाही. हलवायचेच काम करणारे चितळे घराण्यातील सगळेच सदस्य उच्च विद्याविभूषित आहेत. अनेक जण इंजिनीरिंग , संगणक शास्त्र , वकिली , डॉक्टर कि या क्षेत्रातील उच्च पदवीधर आहेत. परंतु त्यातील कुणीही , कधीही हलवायचेच कशाला दुग्ध व्यवसाय आणि मिठाई व्यवसायातले कोणतेही काम अगदी गाई - म्हशीचे शेणमूत काढणे , गोठा साफ करणे इथपासून ते भट्टीवर उभे राहून मिठाया बनवायचे , तळणाचे , व दुकानात उभे राहून मिठाईचे डबे भरायचे अशा कुठल्याच कामाला कमी दर्जाचे व हीन मानत नाहीत. उलट जे काम आपल्याला पोटापाण्याला लावते , जीवनात स्वाभिमानाने उभे करते, प्रतिष्ठा - पत मिळवून देते , स्वालंबी बनविते असे कुठलेच काम कधी हलके व कमी असू शकत नाही , असा प्रत्येक चितळ्याचा दृढ विश्वास आहे. चितळे बंधू मिठाई वाल्यांकडून लाखो ग्राहक जशी नाना प्रकारची मिठाई घेतात त्याचप्रमाणे संस्कारही घेण्यासारखाच आहे. विशेषतः उद्योजकांच्या संदर्भात श्रमप्रतिष्ठा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण बहुसंख्य उद्योजकांच्या संदर्भात श्रमप्रतिष्ठा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण बहुसंख्य उद्योजकाचे हे पांढरापेशा म्हणतात तसे सुटाबुटात वावरण्याचे नसते. ते श्रमात असते. मातीत , मशीनवर हात काळे करण्याचे असते. अशा कामाची उद्योजकाने कधीही लाज वाटू देता काम नये. कितीही उच्च विद्याविभूषित असेल तरी !
गुणवत्ता आणि सचोटी : - समाजाने , उद्योजकाने ' चितळे बंधू ' फर्म कडून शिकायची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मालाची गुणवत्ता आणि व्यवहारातील सचोटी या दोन्ही बाबत ते सतत दक्ष आहेत म्हणून त्यांचा नावलैकिक टिकून आहे. कुठलाही " ब्रँड ' विलक्षण लोकप्रिय झाला कि , त्याची नक्कल सुरु होते. अनेक गैरप्रकारही सुरु होतात. भेसळ , डुप्लिकेट माळ बाजारात येतो आणि मूळ ब्रँड चा नावलैकिक धुळीस मिळू लागतो. चितळेंचे अनेक प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांच्या मिठाया , दूध , दुग्धजन्य पदार्थ ( श्रीखंड , तूप इत्यादी) यांचे पॅकेजिंग त्याची नक्कल करण्याचा दृष्टीने साधे सोपे आहे. तेव्हा लबाड लोक चितळे नावाखाली डुप्लिकेट माळ बाजारात आणू शकतात , हे ओळखून चितळेंनी पॅकेजिंग बाबत अनेक प्रकारच्या यांत्रिक - तांत्रिक खबरदार्या घेतल्या आहेत जेणेकरून कुणाच्याही आदी लबाड डुप्लिकेट करणाऱ्याचाही लक्षात येतो. नवनवीन यंत्रतंत्राची मदत चितळे बंधू तत्परतेने घेतात. त्यांच्या बहुतांश मिठाया आता स्वयंचलित , गतिमान यंत्रतंत्राचा वापर करून करून तयार केल्या जातात. त्यामुळे मालाचा दर्जा , एकजिनसीपणा टिकवून ठेवता येतो. व्यवहाराबाबतही विलक्षण पारदक्षता आणि सचोटी राखली जाते. धंद्याच्या निमित्ताने चितळ्यांच्या संबंध अडाणी व अल्पशिक्षित , शेतकरी , गवळी , खेडूत यांच्याशी येतो. अडाणी व अल्पशिक्षिताना ठकविणे सोपे असते. परंतु चितळ्यांच्या सगळ्याच आर्थिक व्यवहाराचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यात कुणी गैरप्रकार करू शकत नाही. त्यामुळेच चितळ्यांशी लोक विश्वासाने मोठेमोठे व्यवहार करतात. हि विश्वसनीयता उच्च गुणवत्ता आणि सचोटीपूर्ण पारदर्शी व्यवहार यातूनच त्यांनी कमावलेली आहे.
शिस्त आणि वक्तशिरपणा : - चितळ्यांपासून उद्योजकांनी आणि एकूणच समाजाने शिकायची आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांची शिस्त आणि वक्तशीरपणा. याबाबत त्यांच्याकडे तडजोड नसते. वक्तशीरपणा व शिस्त याबद्दलचा चितळ्यांचा दरारा एवढा आहे कि, त्याबाबत अनेक विनोदी चुटके , विनोद प्रचलित आहेत. दुपारी चितळ्यांची दुकान बंद असतात यावरूनही सोशल मीडियातून त्यांना अनेक टोमणे , टिंगलटवाळी सहन करावी लागते. परंतु चितळ्यांचे काम पहाटे चालू झालेले असते. त्यामुळे दुपारची विश्रांती गरजेची असते. कुठल्याही कंपनी , दुकाने , कार्यालये यांच्यापेक्षा चितळ्यांशी संबंधित कर्मचारी अधिक काम करीत अनेक छोटी मोठी उपकरणे , यंत्रे , अवजारे चितळ्यांच्या घरातील लोकांनी त्यांचा अनुभव आणि अक्कलहुशारीचा , वापर करून स्वतः विकसित केलेली आहेत. अन्यथा परदेशी बनावटीचीच यंत्रे दहावीसपट अधिक किंमत मोजून घ्यावी लागली असती. कामसवृत्ती, कामात गतिमानता आणि सुधारणा कशी करता येईल याचा सततचा ध्यास , संशोधन वृत्ती , प्रयोगशीलता असेही अन्यही अनेक दुर्मिळ उद्योजकीय गुण चितळ्यांपासून शिकण्यासारखे आहेत.
ग्रामीण उद्योजकता : - मिठाई , दुग्धोत्पादन , पशुसंवर्धन , निर्यात अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ' चितळे बंधू ' या फर्म मध्ये त्यांची आता चौथी पिढी काम करते आहे. परंतु संस्थापक बी.जी.चितळे यांनी सत्तर - ऐशीं वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक भिक्षुकी व्यवसायातून कुटुंब पोसण्यापुरते उत्पन्न मिळत नाही. महागाई सतत वाढते आहे. म्हणून उत्पन्न वाढविण्यासाठी चार दुभती जनावरे घेऊन दुग्धउत्पादनाचा जोड व्यवसाय सुरु केलेला होता. परंतु नंतर तोच त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला. १९३९ च्या सुमाराची हि गोष्ट आहे. साताऱ्या जवळच्या एका छोट्याशा खेड्यात त्यांनी दुधाचा धंदा सुरु केला. त्याकाळी खेड्यापाड्यातून कुठल्याही प्रकारच्या पशुवैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध नव्हत्या. पशुवैद्य नव्हते. त्यामुळेच जनावरांच्या आजारांवर औषधोपचाराची कुठलीही सोय नव्हती. घटनांच्या अनपेक्षित वळणामुळे त्यांचे गुरे एका अज्ञात आजाराला बळी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. यामुळे चितळे कुटुंबाच्या मालकीच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले
चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. हिची स्थापना इ.स. १९३९मध्ये भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली. चितळे यांची दुसरी पिढीतीले काकासाहेब व नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करणारी ही एक मोठी नावाजलेली कंपनी आहे.
प्रतिदिन २.४ लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते.