ऑनलाईन खरेदित फासगत होते तेव्हा

ऑनलाइन शॉपिंग करण्याची सध्या सगळ्यांनाच हौस. खरेदीचा सोपा पर्याय.पाहिलं, आवडलं, निवडलं, क्लिक केलं, पैसे मोजले, झाली खरेदी.मात्र इथंही चतुर चोर तुम्हाला गंडा घालायला टपून बसलेले आहेत, हे लक्षात ठेवा!

ऑनलाईन खरेदित फासगत होते तेव्हा

सध्या ऑनलाइन शॉपिंगकडे स लोकांचा, विशेषत: तरुणाईचा कल वाढत चालला आहे. एकंदरीत किरकोळ व्यापाराच्या उलाढालीत या शॉपिंगचं प्रमाण अजून तसं कमी असलं तरी हे प्रमाणही वाढत आहे, याची नोंद घेणंही आवश्यक आहे. उदाहरण द्यायच
झाल्यास, चीनमध्ये २०१२ मध्ये सुमारे २४२ दशलक्ष लोकांनी 'ऑनलाइन शॉपिंग द्वारे। विविध वस्तू, सेवांची खरेदी केली. एकट्या चीनचं उदाहरण पाहिलं तरी या 'ई कॉमर्स ची लोकप्रियता किती वाढत चालली आहे, हे लक्षात यावं.

१९९१ मध्ये पहिला 'वर्ल्ड वाइड वेब सर्व्हर आणि ब्राउझरचा व्यावसायिक वापर करण्यास प्रारंभ झाला. पाहता पाहता ऑनलाइन शॉपिंग च्या अनेक वेबसाइट्स अस्तित्वात आल्या. त्या लोकप्रियही झाल्या.

भारतातही आज अशा अनेक वेबसाइट्सच्या माध्यमातून असंख्य मंडळी वस्तूंची खरेदी-विक्री करीत असतात. 'बिझिनेस टू कन्झुमर' (B2C) या ऑनलाइन शॉपिंगला आपल्या देशातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंग द्वारे आपल्याला अत्यंत दर्जेदार, हवी तशी वस्तू मिळत आहे असा ग्राहकांना विश्वास निर्माण झाला की या सेवेची विश्वासार्हता वाढत जाणार हे उघडच आहे.

'ऑनलाइन शॉपिंग' अनेक दृष्टीनं फायदेशीर असलं तरी त्यातील काही धोके लक्षात घेऊन अशी खरेदी केल्यास ती सुखद ठरू शकते. भारतातही आता खूप मोठ्या संख्येनं ऑनलाइन शॉपिंग होत आहे. मिळणारी सुट, विविध प्रकारच्या मिळणाऱ्या ऑफर्स, स्मार्टफोन, टॅब्लेट्स

आणि संगणक यांचा वाढता वापर यामुळे ऑनलाइन शॉपिंग लोकप्रिय होत चाललं आहे. सध्या ई-कॉमर्स क्षेत्रात गुदाम व वाहतूक कर्मचारी या नात्यानं अनेकांना रोजगार मिळत आहे. पुढील काही वर्षांत आणखी हजारोंना या क्षेत्रात रोजगार मिळेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विस्तार होत आहे. पण अशी ऑनलाइन खरेदी करताना

ग्राहकांनी तेवढी काळजी घेणंही अत्यावश्यक आहे. बाजारात खरेदी करताना वस्तू तुमच्या हातात असते, ज्याच्याकडून घ्यायची तो विक्रेताही समोर असतो; पण 'ऑनलाइन शॉपिंग'मध्ये मात्र विक्रेताही समोर नसतो वा विक्रेत्याला गि-हाईकही दिसत नसतं. खरेदी करायची वस्तू तेवढी दिसते, त्याचा सर्व तपशील त्याद्वारे समजतो. तो लक्षात घेऊन मागणी नोंदविली की त्या वस्तूचा मोबदला, आपण जो पर्याय निवडू त्या पर्यायाद्वारे द्यावा लागतो. नंतर ती वस्तू अगदी कसलीही धावपळ न करता अगदी आपल्या दरवाजात हजर होते.

वर वर साधा सरळ वाटणारा हा व्यवहार पण अगदीच बेफिकीर राहून केला तर यातही खूप धोके आहेत.

ऑनलाइन फसगत टाळण्यासाठी

आपण ज्या वेबसाइटद्वारे खरेदी करणार असू ती वेबसाइट किती विश्वासार्ह आहे याची खातरजमा करण्यात यावी. या वेबसाइटसंदर्भात ग्राहकांनी आपले चांगले वाईट अनुभव नोंदविलेले असतात, त्या रिव्हाचा अभ्यास करून मग संबंधित साइटद्वारे खरेदी करायची की नाही, याचा निर्णय घ्यावा. तसे न केल्यास फसगत होण्याची शक्यता असते.

वस्तू खरेदी करताना त्याचे वर्णन व किमत यांचा नीट अभ्यास करावा. तसेच संबंधित वेबसाइटच्या पॉलिसीचाही नीट अभ्यास करावा. काही वेबसाइट एकदा ऑर्डर दिली की ती रद्द करीत नाहीत. असे असेल तर मग नको असलेली वस्तू घेणं भाग पडतं. त्यामुळे होणारा मनस्ताप वेगळाच!

काही वेबसाइट्स 'सेक्युअर शॉपिंग चा वापर करीत नाहीत. अशा साइटचा वापर करून खरेदी केल्यास आपली वैयक्तिक माहिती व क्रेडिट कार्ड संबंधातील माहितीची चोरी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन तशा वेबसाइटवरून खरेदी न करणंच चांगलं!

ऑनलाइन खरेदी करताना सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळणंच हिताचं! तसेच ऑनलाइन पेमेंट करताना 'सिक्युरिटी सॉफ्टवेअर' असण्याची खात्री केल्यानंतरच पेमेंट करावं. ऑनलाइन पेमेंट जर क्रेडिट कार्डद्वारे करीत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेकडून येणारी स्टेटमेंटस् वेळोवेळी तपासायला हवीत. क्रेडिट कार्डचा वापर जर सातत्यानं होत असेल तर त्याचा पासवर्डही सतत बदलायला हवा. हँकर्स मंडळींना संधी द्यायची नसेल तर असं करणं गरजेचं आहे.

ऑनलाइन शॉपिंग' करताना डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करावा, तुम्ही जी खरेदी करता त्याची नोंद तुमच्याकडे ठेवायला हवी, तसेच तुम्ही ज्या संगणकाचा वापर करता तो संगणक अत्यंत सुरक्षा यंत्रणा असलेला असावा, याची खात्री करून घ्यावी.