कश्मीर म्हटले की, सर्वप्रथम डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते म्हणजे पांढरे शुभ्र बर्फ हो नैसर्गिक सुंदरतेची देणगी म्हणून लाभलेल्या या सुंदर प्रदेशात प्रत्यक्ष जाऊन या बर्फाशी खेळताना जीवनाचे मनसोक्त आनंद लुटावे असे स्वप्न जवळजवळ प्रत्येकाचेच असते मात्र अनेक वेळा कश्मीरची ट्रिप करून सुद्धा बर्फाचा आनंद प्रत्येकालाच लुटता येतो असा नाही कारण कश्मीर ट्रीपला जाण्याचे जर तुम्ही नियोजन करत असाल तर त्यासाठी अगोदर आपल्याला कश्मीर येथील हवामानाबद्दल संपूर्ण माहिती असायला हवी जसे की,कश्मीर या ठिकाणी बर्फाचा खास आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केलेले नियोजन योग्य असते. बाकी एप्रिल मे मध्ये गेल्यावर बर्फ हवा तसा पाहायला भेटेल याची शक्यता नसते म्हणून जानेवारीमध्ये हवामानाच्या आनंदाजानुसार जर आपण नियोजन केले तर आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह बर्फ सुद्धा अनुभवता येते. श्रीनगर या शहरांमध्ये प्रत्यक्ष बर्फ पडताना आपण पाहू शकतो मात्र बर्फाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सोनमर्ग, पहेलगाम आणि गुलमर्ग असे प्रसिद्ध ठिकाण आहेत या ठिकाणी थोड्या प्रमाणात जर बर्फ पडले असेल तर उंच पहाडापर्यंत आपण पोहोचू शकतो मात्र जास्त बर्फ पडलेले असेल तर अगदी पायथ्याशीच आपल्याला जाता येते कारण अति बर्फवृष्टी मुळे अनेक वेळेस रस्ते बंद पडतात.
तर चला आज जाणून घेऊया गुलमर्ग बद्दल श्रीनगर येथून जवळ जवळ 50 ते 54 किलोमीटरच्या अंतरावर गुलमर्ग आहे सकाळी श्रीनगर येथून आठ वाजता जर गुलमर्गला निघालो तर जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत आपण गुलमर्गला पोहोचू शकतो. गुलमर्ग ला जाण्यासाठी केलेली गाडी ही जर प्रायव्हेट असेल तर ह्या गाडीमध्ये चैन ची सुविधा आहे का हे आपण पहिले कन्फर्म करून घेतले पाहिजे कारण गुलमर्गला पोहोचण्या अगोदर टंगमर्ग या ठिकाणी गाड्यांची चौकशी पहिली केली जाते की तुमची गाडी ही उंच पहाडापर्यंत पोहोचण्यासारखी आहे की नाही जर नसेल तर टंगमर्ग या ठिकाणाहून तुम्हाला दुसरी गाडी करावी लागते.एखाद्या वेळेस जास्त बर्फ पडलेला असेल तर गाड्यांना चैन लावण्याची आवश्यकता पडते असे तेथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते मात्र ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे होते त्या ठिकाणापर्यंत असा कोणताही रस्ता आम्हाला दिसला नाही की तेथे गाड्यांना चैन लावायची आवश्यकता पडत असावी तरी देखील तेथील नियमानुसार आपण गाडीची पहिलीच चौकशी केलेली योग्य. आणि तसेच या ठिकाणी जाताना विशेष आवश्यकता पडते ती म्हणजे बर्फामध्ये चालण्यासाठी प्लास्टिकच्या बुटांची जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर हरकत नाही मात्र तेथे उतरल्यावर किंवा टंगमर्ग या ठिकाणी देखील भाड्याने शूज आणि स्वेटर मिळतात. मात्र आपल्याला हवी अशी ती कम्फर्टेबल नसल्यामुळे अशा ठिकाणी फिरायला जात असताना आपण आपले जॅकेट स्वतःच घेऊन गेलेले बरे.
गुलमर्ग हे सैनिकी क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी आर्मीच्या जवानांसाठी स्केटिंग ट्रेनिंग ची जागा आहे. काही एक भाग सोडला की बाकी ठिकाणी आपण स्केटिंग करू शकतो या ठिकाणी जवळच महादेवाचे एक देऊळ आहे ते देखील बर्फाने पूर्ण ढकलेले असल्यामुळे या ठिकाणी चढताना आणि उतरताना विशेष काळजी घ्यावी लागते.. बर्फावर घसरण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी देखील येथे छोट्या गाड्या उपलब्ध असतात नवीन पर्यटक बघून या ठिकाणचे स्थानिक व्यवसायिक घसरण्याच्या गाड्या तसेच स्केटिंग साठी तीन पट चार पट रक्कम सांगतील मात्र आपल्याला या सर्व ठिकाणचे रेट माहिती असून इतके रेट नाही असे आपण सांगितले की मग आपोआप कमी किंमत करतात मग कमी किमतीमध्ये आपण स्केटिंग आणि बर्फावर घसरणाऱ्या गाड्यांचा सहज आनंद घेऊ शकतो. कोणतीही गाडी न करता चालत चालत बर्फाचा आनंद घेत घेत आपण त्या ठिकाणी असलेल्या गंडोला कार ची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणाकडे जाऊ शकतो ह्या कारचे तिकीट्स ऑनलाईन पहिलेच बुक करावे लागतात आणि याची आवश्यकता म्हणजे जर गुलमर्ग या ठिकाणी खाली तुम्ही फिरत असलेल्या ठिकाणी जर बर्फ पडलेला नसेल तर उंच ठिकाणी जाऊन बर्फ पाहण्यासाठी असते त्यामुळे जर तुम्ही फिरत असलेल्या ठिकाणावर भरपूर प्रमाणात बर्फ उपलब्ध असेल आणि तुम्ही गंडोला कारचे तिकीट ऑनलाईन बुक केलेले नसतील तर त्या ठिकाणी न थांबता तुम्ही तेथील इग्लूज, तसेच हॉटेल्स यांचा आनंद घेऊ शकता त्या ठिकाणी रात्री थांबण्यासाठी देखील हॉटेल्स बुक करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. चौफेर बर्फ आणि फक्त बर्फ त्यावर चालण्याचा,घसरण्याचा आनंद घेत घेत तसेच या अविस्मरणीय क्षणांना कॅमेरा मध्ये कैद करत करत पूर्ण दिवस कसा निघून जातो हे आपल्याला लक्षात देखील येत नाही. अगदी परत परत आठवण करावी असा अविस्मरणीय क्षण ह्या ठिकाणी आपण जगत असतो. अशा या क्षणाला कायम स्मरणात ठेवण्यासाठी आपल्या वयाचा विचार न करता फक्त आणि फक्त त्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणाचा आनंद घेता यायला हवा तरच तुम्हीही म्हणू शकाल गुलमर्ग एक अविस्मरणीय क्षण.
पूनम सुलाने,महाराष्ट्र