आशिया खंडातील सर्वात मोठा ट्यूलिप गार्डन म्हणून ओळखला जाणारा हा गार्डन श्रीनगर या शहरात आहे. धरतीचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय ऋतुचक्राप्रमाणे बदलणाऱ्या प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते. अगदी त्याचप्रमाणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कडाक्याच्या हिवाळ्यानंतर हळूहळू श्रीनगरचे बदलते रूप आपल्याला अनुभवता येते,, बर्फामुळे पानझड झालेल्या सर्व झाडांना हळूहळू पालवी यायला सुरुवात होते आणि अशातच मग तयारी सुरू असते ती देश-विदेशातील पर्यटकांसाठी ट्यूलिप गार्डन तयार करण्याची हो पूर्ण जगातून विविध रंगाचे ट्यूलिप फुलांच्या विविध जाती तसेच वेगवेगळ्या रंगांची निवड करून हे गार्डन तयार केले जाते आणि त्यानंतर मग वाट पाहिली जाते या सुंदर सुंदर फुलांच्या उमलण्याची जवळजवळ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे गार्डन सर्वांसाठी ओपन केले जाते.
याबद्दल अनेक पर्यटकांना प्रश्न पडलेला असतो की या ठिकाणी ऑनलाइन तिकीट वगैरे बुक करावी लागते का तसं काही नसतं एकदा गार्डन ओपन झाले की आपण तिथे गेट समोर तिकीट बुक काउंटरला तेथील कमिटी द्वारा ठरवलेल्या रकमेप्रमाणे आपण तिकीट काढून शकतो. तिकीटचे रेट देखील इतके जास्त नसतात त्यानंतर पूर्ण दिवस देखील या गार्डनमध्ये आपण फिरत राहिलो तरी आपल्याला कोणीही बाहेर निघायला सांगणार नाही.तरी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले गेले असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही फुलांना कोणी नुकसान पोहोचवू नये यासाठी वेळोवेळी लाऊडस्पीकर च्या माध्यमाने सूचना दिल्या जातात. विविध रंगी फुलांनी नटलेले हे गार्डन इतके मोठे आहे हे की, माझ्या मते जवळजवळ याला पूर्ण पाहायचं असेल तर आपल्याकडे कमीत कमी पाच-सहा तास तरी हवे तेव्हाच कोठे आपल्याला या फुलांचा मनसोक्त आनंद घेता येईल.
सुरुवातीलाच गार्डनमध्ये प्रवेश करताना आपल्याला आकर्षित करतील ते विविध रंगाचे अगदी एका रांगेने लावलेले ट्युलिपचे सुंदर सुंदर नाजूक फुले अगदी डोळ्यांचे पारणे फिटावे इतके सुंदर लांबच लांब फुलांच्या रांगा त्याच्या बाजूला विविध रंगी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळी फुले हिरवेगार गालिचे, पाण्याचे सुंदर सुंदर फवारे, विशेष आकर्षित करणाऱ्या जबरवान या पर्वताच्या पर्वतरांगा आणि तेथूनच पहायला भेटते ती श्रीनगरची प्रसिद्ध डल झील हे सर्व प्रत्यक्ष पाहताना निसर्गाचा सुंदर आनंद घेता घेता अगदी सर्व काही विसरून जावे अशा या सुंदर परिसराला देश-विदेशातील तसेच स्थानिक पर्यटक देखील प्रत्येक वर्षी अवश्य भेट देतात. त्यामुळे गर्दी तर असते मात्र खूप मोकळी जागा असल्यामुळे अगदी मनसोक्त विविध रंगी फुलांसोबत कायम स्मरणात राहो अशी फोटोग्राफी आपण सहज करू शकतो यासाठी आपल्याकडे एखादा छान कॅमेरा किंवा मग चांगल्या क्वालिटीचा मोबाईल असायला हवा तेव्हाच अगदी मनासारखी फोटोग्राफी आपण या ठिकाणी करू शकतो.
60 पेक्षा अधिक जातीच्या एकूण 15 लाखापेक्षा जास्त फुलांची लागवड एकाच वेळी एका गार्डनमध्ये केल्या गेल्यामुळे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन ची आशिया खंडातील सर्वात मोठा ट्यूलिप गार्डन म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जम्मू कश्मीरमध्ये सतर्कता पाळली जाते अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील जागोजागी बीएसएफचे जवान तैनात दिसतील. सोबत नेलेले वाहन पार्किंग करायला देखील चांगल्या जागा असून गार्डनमध्ये फिरून आल्यानंतर चाय नाश्ता करण्यासाठी देखील छान हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहे. कश्मीरमध्ये फिरण्यासाठी जर प्लान करत असाल तर आपल्या लिस्टमध्ये ट्यूलिप गार्डन जे की फक्त एका महिन्यासाठी उपलब्ध असते त्यानुसार नियोजन केल्यास कश्मीरच्या सहलीची मजा आपल्याला नक्कीच कायम स्मरणात राहील अशी होणार.
यात शंका नाही.
पूनम सुलाने, जालना,महाराष्ट्र