फसगत होते तेव्हा..

मेधा बारावीपर्यंत शिक्षण झालेली ग्रामीण भागातील मुलगी पुढे शिकण्याची इच्छा असूनही यहिलानी तिच्या विवाहचl घाट घातला

फसगत होते तेव्हा..

मेधा बारावीपर्यंत शिक्षण झालेली ग्रामीण भागातील मुलगी पुढे शिकण्याची इच्छा असूनही यहिलानी तिच्या विवाहच घाट घातला गावाजवळच्याच एका परिचित पण सध्या शहरात नोकरी करणाऱ्या मुलाशी मेधाच लग्न ठरवल मुलगा आपल्या परिसरातलाच पण शहरात नोकरदार आहे असे म्हणत लग्न करण्याची घाई केली कर्ज काढून थाटामाटात लग्न लावून दिलं

खेड्यात वाढलेली मेघा बावरत-बुजत विलासबरोबर शहरात नांदायला आली. नवरा शहरात आल्यापासून मेघाशी नीट बोलत नव्हता. तुटक तुटक वागत होता नवराबायको म्हणून त्यांच्यात काही नात निर्माणच झालं नाही. लग्नाला सात-आठ आठवडे झाल्यावर हिंमत एकवटून मेधान विलासचा पिच्छा पुरवला असता. त्यानं आपलं ऑफिसमधील मुलीवर खूप प्रेम आहे आणि आता लग्नानंतरही त्या दोघांमधले नातेसंबंध पूर्वीसारखेच असल्याचं तिला सांगितलं. केवळ घरच्यांच्या इच्छेनुसार विलासनं नाइलाज म्हणून मेधाशी लग्न केलं होतं विलासचं वास्तव हे अशा पद्धतीनं समोर आल्यानं मेघा कोसळली, हताश झाली. आता आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणून तिच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचे विचार येऊन गेले अशा हताश परिस्थितीत काय करावं हेच तिला कळत नव्हतं.

या प्रश्नाकडे बघताना...

मेधासमोरची परिस्थिती खरोखर अवघड आहे पण ही परिस्थिती जर मेधानं विचारपूर्वक हाताळली तर ती यातून बाहेर पडू शकते या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गाचा विचार करताना ही परिस्थिती मेघा आणि तिच्यासारख्या इतर मुलींवर का येते याचाही विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडच्या विवाहविषयक विचारसरणीतील पारंपरिकता आजही फारशी कमी झालेली नाही आपल्या मुलांनी आपण म्हणू त्या मुलाशीच लग्न केलं पाहिजे.

पालकांचा अट्टहास जराही कमी झालेला नाही मुला-मुलीचे विवाह ठरविण्यापूर्वी त्यांची विवाहयोग्य मानसिकता आहे की नाही याचा अंदाज घेतला जात नाही. विवाहेच्छुक मुलामुलींनी त्यांचे विवाह यशस्वी होण्यासाठी

कोणत्या गोष्टींचा कशा पद्धतीनं सांगोपांग विचार करायला हवा,

यासाठी घरातील ज्येष्ठ फारशी तसदी घेत नाहीत मुला-मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर, त्यांना एकमेकांशी मुक्त वातावरणात आजही अनेक ठिकाणी नीट बोलू दिलं जात नाही.

॥ आपल्या मनाविरुद्ध विवाह ठरत असताना घरातील ज्येष्ठाशी आपल्या जोडीदाराविषयीच्या कल्पना, विचार, अपेक्षा, आवड इ. महत्त्वाच्या गोष्टींबाबत समंजस संवाद तरुण वर्गाकडून होत नाही

असा संवाद होऊनही वडीलधारी मंडळी ऐकत नसलीच तर त्यांच्याविरु द्ध ठाम भूमिका वधू-वरांकडून घेतली जात नाही.

आणि या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन मेघासारख्या कितीतरी मुलीच्या वैवाहिक आणि भावनिक आयुष्याचा बळी जातो.

हा प्रश्न हाताळताना..

नवऱ्याकडून आपली फसवणूक झाली म्हणून आपल्या जगण्यात काही राम राहिला नाही असं म्हणून जिवाचं बरं-वाईट करून घेऊ नका. आपल्या आयुष्यातील हे एक भावनिक वादळ आहे, असे समजून यातून विचारपूर्वक मार्ग काढण्यासाठी जरा चित्त शांत ठेवावं । जोडीदाराला नेमकं काय हव आहे. त्याचं काय म्हणणं आहे हे यथास्थित जाणून घ्यावं

नवरा जर आपल्या पूर्वीच्या प्रेयसीला विसरून बायकोशी समरस व्हायला तयार असेल, तर आपण त्यासाठी नक्की तयार आहोत का? याबाबत स्वत:चा स्वतःशी संवाद असायलाच हवा.

पूर्वीचे सर्व विसरून जर एकमेकांबरोबर नव्याने सुरुवात करण्याची दोघांची तयारी असेल तर याबाबत एकमेकांना कसे पूरक राहता येईल, याला प्राधान्य द्यार्य आपला जोडीदार पूर्वीच्या प्रकरणातून बाहेर पडायला तयार झाला आहे, म्हणून बायकोन बेफिकीर राहू नये. सावधानता आणि संयम बाळगून जोडीदाराला आपलं सहकार्य होईल, अशी रास्त वागणूक ठेवावी. जोडीदार आपल्या पूर्व प्रेयसीला विसरण्यासाठी तयार झाला असला, तरी त्याला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे, याची जाणीव ठेवून तशी मनाची तयारी करायला हवी. या गोष्टी दोन्हीकडच्या घरच्यांच्या कानावर घालण्याची घाई करू नये विचारपूर्वक सारी माहिती द्यावी.

आपला जोडीदार पूर्व प्रेयसीला विसरण्यासाठी तयार नसेल तर दोघांच्याही घरच्या अनुभवी, ज्येष्ठ, विचारी मंडळींना बोलावून घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून सामंजस्यान यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढावा

परस्पर संमतीनं घटस्फोट घ्यावा. एक दुर्दैवी अनुभव इतकच या प्रकरणाला आपल्या आयुष्यात स्थान असू द्यावं यासाठी स्वत ला, नशिबाला दोष देत बसू नये

सामंजस्याची भूमिका घेऊनही जोडीदारानं काही त्रास दिल्यास किंवा असहकार केल्यास सरळ कायदेविषयक सल्ला घ्यावा. अशा परिस्थितीत त्याला माफ करण्यात काही अर्थ नाही, हे कदापिही विसरू नये.