बहिणीच्या मायेचा झरा : कांचनताई पवार

कांचनताई एक बहीण म्हणून श्रेष्ठ आहेतच, तशाच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहेत. असं त्यांच्या कविता वाचल्यानंतर जाणवते.

बहिणीच्या मायेचा झरा : कांचनताई पवार

वक्तृत्व ही काही सहजासहजी मिळालेली देणगी नसते. ईश्वराने दिलेली ती एक अमूल्य भेट म्हणजे वक्तृत्व. वक्तृत्वाची देणगी मिळालेल्या कांचनताई पवार या शैक्षणिक क्षेत्रातील एक भूषणच आहे. कांचनताई आणि माझी ओळख ही अलिकडेच झालेली. कांचनताईचे बंधूप्रेम म्हणजे पराकोटीचेच आहे. त्यांचे दोन्हीही भाऊ अमेरिकेत असतात. कांचनताईचा केव्हाही फोन झाला तर त्या भावांची आठवण नक्कीच काढणार. आणि माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मला ही भाऊ मानतात. त्या त्यांच्या भावाला जेवढे प्रेम देतात. तेवढेच प्रेम  मला देखील देतात. मला असं कधीच वाटलं नाही की, मी त्यांच्या भावापेक्षा वेगळा आहे म्हणून. इतक्या कांचनताई एक बहीण म्हणून श्रेष्ठ आहेत. कांचनताई म्हणजे बहिणीच्या मायेचा झराच आहे. असे मला नेहमीच मनापासून वाटते.

कांचनताई एक बहीण म्हणून श्रेष्ठ आहेतच, तशाच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहेत. असं त्यांच्या कविता वाचल्यानंतर जाणवते. त्यांनी आतापर्यंत शेकडो वास्तववादी कविता लिहिलेल्या आहे. तसेच त्यांचे कृषिका कवितासंग्रह व कृता चारोळीसंग्रह असे दोन पुस्तके देखील प्रकाशित देखील झालेले आहेत.

तसेच एक शिक्षिका म्हणून देखील त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी त्या नेहमीच समजून घेऊन त्यावर मार्ग काढतात. तसेच शाळेतील मुलींची तर त्या आईसारखी काळजी घेतात. जी शिक्षिका आई होऊन शाळेत जाते ना, तीच शिक्षिका भविष्यातील समृद्ध पीढी घडवू शकते, असे मला तरी वाटते. कांचनताई शाळेतील सहावी ते दहावीच्या मुलींसाठी गुड टच बॅड टच उपक्रम राबवत असतात. या कार्यक्रमाद्वारे सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग आणि ते कसं वापरावं स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी नेहमीच मार्गदर्शनपर उपक्रम घेत असतात. 

तसेच कांचनताईंनी कोरोना काळात देखील कवितांच्या माध्यमातून खुप मोठी अशी जनजागृती केलेली दिसून येते, कोरोना जनजागृती करण्यासाठी  त्यांची मराठी कविता 'कोरोना', 'करू लाॅकडाऊनचा स्वीकार', 'देवा कुठे घ्याव्यात धावा', याद्वारे कोरोना संसर्ग कसा होतो घ्यावयाची उपाय व घरीच राहून सुरक्षित कसे रहावे याचे मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. तसेच हिंदी कविता 'तू ही ईश्वर', 'जज्बा बरकरार रहे', 'डरो नही डटे रहो', 'ना जाने कब खुलेगी पाठशाला'
या विविध कवितेद्वारे त्यांनी जनजागृती केली. तसेच कोरोना काळात न घाबरता खंबीरपणे या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचा आणि विश्वातील तमाम डॉक्टर बांधवांना 'तू ही ईश्वर' ही कविता त्यांनी समर्पित केली. तसेच त्यांनी बंजारा कविता 'हमार वेला' याद्वारे मजूर व कामगार लोकांच्या व्यथा देखील मांडलेल्या आहेत. तसेच ताईंनी दोन वर्षात ५० न्यूज चॅनल, यू-ट्यूब चॅनल व विविध नामांकित वर्तमानपत्रातून कोरोनाविषयक जनजागृती केली आहे. कोरोना काळात संपूर्ण भारतभर केलेल्या जनजागृती बद्दल त्यांना २०२१ चा 'इंटरनॅशनल वुमन प्राईड अवॉर्ड' देखील मिळालेला आहे. 

तसेच त्या दरवर्षी 'झाडे लावा झाडे जगवा' हा उपक्रम शाळेत व इतर ठिकाणी राबवत असतात. तसेच त्या उत्कृष्ट निवेदिका असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात निवेदन करत असतात. तसेच ताईंना विविध संस्थांनी शाळांनी परीक्षक म्हणूनही आमंत्रित केले होते. तसेच त्या शाळेच्या विविध सण उत्सव, जयंतीनिमित्त उत्कृष्ट असे फलक लेखनही करतात. अशा कांचनताईच्या कार्याला माझा मनापासून सलाम

 Baba Channe Bol Marathi

बाबा चन्ने, धोंदलगाव,
धोंदलगाव, ता. वैजापूर