या देशातील जिजाऊ सारख्या निर्भीड, निडर स्त्रीया कुठं गेल्या आहे?

चांगले संस्कार अन् संरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर आपल्याला जिजाऊ पुन्हा पाहावयास मिळतील ! पुन्हा कर्तृत्ववान स्त्री व उत्तम समाज घडेल.

या देशातील जिजाऊ सारख्या निर्भीड, निडर स्त्रीया कुठं गेल्या आहे?

आज ची सामाजिक परिस्थिती पहाता आज समाजाला निर्भीड, निडर अशा स्त्रियांची गरज आहे. आपण ज्या देशातून येतो त्या देशाचा इतिहासच हा निर्भीड, निडर स्त्रियांच्या कार्याने व रक्ताने लिहिलेला आहे. खरं तर आज सुद्धा या आपल्या देशाला निर्भीड, निडर लढवय्या स्त्रियांची गरज आहे परंतु आज इथे माझ्यासारख्या नव तरुणांना प्रश्न पडतो की काय घडले असे की या देशातील निर्भीड, निडर अशा स्त्रिया कुठं गेल्या आहेत ? 

ज्या देशाचा इतिहासच हा स्त्रियांच्या लढाई शिवाय अपूर्ण आहे, त्या देशातच आज का बलात्कार, Acid हल्ला, आणी विनयभंग अशा घटना पाहायला मिळतात. ज्या देशाला जिजाऊ, सावित्रीमाई, रमाई, महाराणी ताराराणी सारख्या लढवय्या स्त्रियांचा इतिहास लाभला आहे तिथेच का आजच्या स्त्रिया बलात्कार, ॲसिड हल्ला, विनयभंग अशा गोष्टींच्या शिकार होत आहे ? विचार केला पाहिजे आपण.

आज का जिजाऊ निर्माण होत नाही? जर आपल्याला या देशाला सुराज्य बनवायचे असेल तर छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पाहिजे. आपण अभिमानाने म्हणतो ना राजे पुन्हा जन्माला या ! तर अगोदर या समाजात आई जिजाऊ जन्माला यायला हवी कारण जर शिवरायांवर संस्कार करणारी जिजाऊच जर जन्माला आली नाही तर शिवाजी राजे जन्माला येणार तरी कसे ? म्हणून अगोदर आजच्या माय माऊलीने आपल्या मुलींवर जिजाऊ सारखे संस्कार करणे गरजेचे आहे. 

जिजाऊ आमची संस्काराची खान, 
वंदन करतो आम्ही नेहमीच ! 
गरज देशाला आहे आज, 
जन्मा यावी आई जिजाऊच !

आज प्रत्येक क्षेत्रात मुली या मुलांच्या बरोबरीने नाहीतर पुढे आहे, मग कुठे कमी आहेत तर ते स्वसंरक्षणामध्ये. आई जिजाऊ या तलवार, घोडा चालवायच्या परंतु आज च्या मुलींना स्वताचे संरक्षण करण्या ईतके सुद्धा प्रशिक्षण नाही आहे. आज चित्रपट मालिका यातुन मुलींना नाजुक साजुक सुंदरता देखणं दिसावं असंच दाखवलं जातं परंतु काही असे चित्रपट आहेत की ते मुलींनी आवर्जून पाहिले पाहिजे जसं की अकिरा या चित्रपटामध्ये दाखवलं आहे की मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे किती गरजेचे आहे म्हणून आजच्या माय- माऊलीने मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, तेव्हा कुठे होणारे हे गुन्हे थांबतील व स्त्री संरक्षण होईल व भविष्यात आपल्याला मुलींवर झालेल्या संस्कारामुळे व तिला दिलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे जिजाऊ पुन्हा पहायला मिळेल. आपण हेच तर करत नाही मुलींना सगळं शिकवतो परंतु जे आज तिच्यासाठी आवश्यक आहे तेच शिकवत नाही म्हणून आज जिजाऊ निर्माण होत नाही. 

चांगले संस्कार अन् संरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर आपल्याला जिजाऊ पुन्हा पाहावयास मिळतील ! पुन्हा कर्तृत्ववान स्त्री व उत्तम समाज घडेल. एक स्त्री काय करु शकते हे आपण पाहिले आहे जिजाऊ, सावित्रीमाई, रमाई व महाराणी ताराराणी यांचा अभ्यास केल्यावर.  यावरुनच समजते मुलींना जर उत्तम संस्कार अन् स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर आपल्याला नक्कीच आई जिजाऊ पुन्हा नक्कीच पाहायला मिळेल. आशा करतो की आपण आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व उत्तम संस्कार देऊन एक नाही हजारो जिजाऊ या देशाला देणार अशी मी या लेखातून आशा व्यक्त करतो. 

Yog Kale

योग काळे 
वाळुज महानगर औरंगाबाद