Search

हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही?

जिजामातेने गर्भावस्थेतच माझा पुत्र या समाजाला स्वतःचे राज्य स्थापन करून देईल. असे स्वप्न बघितले होते. तसेच त्यांनी त्या दिशेने शिवरायांना मार्गदर्शन व संगोपन केले.

आजच्या आधुनिक माॅमला माता म्हणावं की नाही हा मोठा प्रश्न आहे

शिवबा घडवताना जिजाऊला स्वतःला विसरावं लागलं. स्वतःच्या आशा-अपेक्षा, इच्छा, आवड यांना तिलांजली देऊनच परकियांच्या  ताब्यातील आपला मुलूख जिंकून, स्वराज्य निर्माण करणारा शिवबा घडवावा लागला.

या देशातील जिजाऊ सारख्या निर्भीड, निडर स्त्रीया कुठं गेल्या आहे?

चांगले संस्कार अन् संरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर आपल्याला जिजाऊ पुन्हा पाहावयास मिळतील ! पुन्हा कर्तृत्ववान स्त्री व उत्तम समाज घडेल.