कधी दुःखाची चादर ओढते
तर कधी दुधावरची साय बनते
खूप कष्ट करुन सुद्धा मुले म्हणतात
आई कुठे काय करते
कधी भाकरीसाठी चटके सहन करते
त्याच फोड आलेल्या हाताने मायेने भरवते
स्वतः उपाशी राहून सुद्धा मुले म्हणतात
आई कुठे काय करते
नऊ महिने बाळाच्या कळा सोसते
जन्म झाल्यावर संगोपन करते
तरीहि मोठी झाल्यावर मुले म्हणतात
आई कुठे काय करते
सर्व चुकांनवर पाणी फिरवते
कधी स्वतःला ती दोषी ठरवते
अपमान सहन करुन सुद्धा मुले म्हणतात
आई कुठे काय करते
दिवसभर अन्नासाठी धडपडते
रोज काबाडकष्ट करते
एवढे आयुष्य झिजऊन सुद्धा म्हणतात
आई कुठे काय करते
वाट्टेल ती हौस पुरवते
आयुष्य मुलांचे उजळून टाकते
स्वप्न स्वतःचे विजवून सुद्धा म्हणतात
आई कुठे काय करते
यंत्रणा सारखी काम करते
काळजाचे पाणी पाणी करते
घराला घरपण आणते तरी मुले म्हणतात
आई कुठे काय करते

कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
गाव हातीप (तेलवाडी),
ता. दापोली, जि. रत्नागिरी.
