ज्याला वेदना कळाल्या त्याला वेद कळाले, ज्याला दुःख कळाले त्याला देव कळाला. एवढ्या कमी वयात वैष्णवीला वेदना कळाल्या, दुःख कळाले, ही खरच खूप श्रेष्ठ बाब म्हणावी लागेल.
बदलत्या काळात आपण आपले संस्कार आणि संस्कृती दोन्ही विसरत चाललो आहोत. जन्मतः जर मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला तर त्याच्या भविष्याबद्दल खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत होतील.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचे ग्रामीण साहित्यिक बाबाजी चन्ने यांच्यावर आधारित एक काव्यसंग्रह तयार झाला, आज २६ नोव्हेंबर रोजी बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले...
बाबाजीवर लिहिलेल्या पुस्तकातील ५६ कवींनी अप्रतिम कवितांचे गुंफन करून बाबाजींना जी काव्यमाळ अर्पण केली आहे. ती अगदी फुलांच्या माळेपेक्षाही सुगंधीत, पवित्र, कधी न झुकणारी व कधीही न कोमेजणारी आहे.
कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे.