रंगात न्हाऊया चला
काळ वेळ विसरूया,
जातपात मागे टाकू
निळा लाल मिळवूया...
हिरव्याची कमालच
सृष्टी डोले सुखातच,
भर टाके भगवाही
आसमंत रंगलाही...
सृष्टीतले चमत्कार
कसे बरे रंगलेत?
प्राणी, पक्षी, फळे, फुले
किती छान सजलेत!
मनातल्या स्वप्नांनाही
चित्रकाराने रेखले,
त्याच्या या भावविश्वात
रंग हे कोणी ओतले!
निर्माण कर्ता तूच रे
अमाप तुझी ही लीला,
खेळ खेळी गोपिकांशी
रंग तुझा उजळीला...
कधी काळा कधी निळा
रंग तुझा बदलतो,
स्वार्थासाठी मानवा तू
रंगांतुनी फसवतो...
रंगांतुनी फसावतो...
सौ. प्रतिमा किशोर साळुंके,
श्रीरामपूर. अहमदनगर.