माझी आई

सौ. प्रतिमा सांळुके लिखित मराठी कविता माझी आई

माझी आई

आई  माझी मायेचा ओलावा
तिच्यात आहे साखरेचा गोडवा...
नानाविध कलेचे माहेरघर तिच्यात
अन् लडिवाळ भावना ह्रुदयात...

घडविले तिने मज संस्कारांनी,
तिच्या सोबत चालेल पावलांनी...
नाही कधीही ती डगमगली,
जशी आहे तशीच उमगली...

अन्नपूर्णा देवी तिच्यात विसावे,
तिच्या सारखे कोणीही नसावे...
सरस्वती देवी तिच्या लेखणीत,
मंजुळ स्वराची गुंफण बोलणीत...

म्हणतात तिला सगळे कणखर,
तिच्यावर प्रेम बरसे मनभर...
स्वाभिमानी जगणे शिकवी मला,
आयुष्यभर जपणार मी तुजला...

आई तुच माझी सखी शोभसी,
भाग्य हे न कधी कुणा लाभसी...
नशीबवान आहे मी मज मानते,
तुच माझी मायबाप देव शोभते...

Pratima Salunke

सौ. प्रतिमा किशोर साळुंके, अहमदनगर