रंग रंगात मिसळले

सौ. शीला श्रीकांत पवनीकर लिखित मराठी कविता रंग रंगात मिसळले

रंग रंगात मिसळले

प्रेम द्विप उजळले
समतेच्या भावनेने
श्वास गंध दरवळला 
विश्वासाच्या अत्तराने 

गुंफले दोन जीव 
प्रितीच्या धाग्याने 
फुलली संसारवेल
प्रणय रेशीमगाठींने 

वर्ण जात धर्म भेद
किती किती सळसळले 
मनाच्या देव्हारातील
देव मात्र हळहळले 

प्रेम द्वीप उजळले 
समतेच्या भावनेने 
रोष राग घृणा मत्सर

सारे मागे सरसावले 
प्रितीच्या फांदीवर 
फूल दोन उमलले 
श्यामल कान्हा भोळी माया 

रूप गोजरे अवतरले 
इवल्या इवल्या पावलांनी 
अंगण अंगण सुगंधले
रंग प्रितीचे

लाल निळा हिरवा पिवळा
रंग रंगात मिसळले
प्रेम वात्सल्य समता ममता
विश्वासाने खळखळले

Sheela Pavnikar

सौ. शीला श्रीकांत पवनीकर
नागपूर