संक्रांत गोडव्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा सण. कितीही नाही म्हटले तरी किंवा फक्त महिलांचा सण म्हटलं तरी संपूर्ण समाज प्रभावीत झाल्याशिवाय राहत नाही.
आजची स्री पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. अगदी गावच्या गल्लीपासून तर विश्वपातळीवर अंतराळापर्यत तीने घेतलेली झेप तिच्या स्व:त्वाची प्रचिती देते. तरी आजही तिची अवहेलना होत आहे.
निसर्गतः ती प्रेमळ असते. प्रेम तिच्या ठायी भरलेलं असतं. तरीही प्रेमापेक्षा तिला सन्मान गरजेचा असतो. तिला सन्मान मिळाला की ती आणखीन प्रेमाने भरून येते झोकून देऊन कोणतेही काम होईल असं करते.
स्त्रीचा जन्म म्हणजे संपूर्ण सृष्टीचा जन्म असतो. स्त्री म्हणजे संपूर्ण जगाची निर्मिती करणारी ती शक्ती आहे. जिच्या उदरी जन्म घेण्यासाठी देवाला सुद्धा प्रतीक्षा करावी लागते.