रात्रंदिन मजला
तुझाच ध्यास
तुझीच आस
लागलीसे
फक्त तुझ्यासाठी
श्वास थांबला
जीव गुंतला
माझा रे
जगण्यास माझ्या
तुच कारण
तुच तारण
झालासे
दूर राहूनही
विचार तुझा
प्राण माझा
तुच रे
भेटशील जेव्हा
तुला कळेल
जीव जळेल
तुझाही
माझ्या आयुष्याची
तूच सुरुवात
दिव्याची वात
असशी तू
हृदयात माझ्या
नित्य सहवास
तुझाच वास
असे सदा
सौ. प्रिती भालेराव, पुणे