गानकोकिळा, लतादीदी Marathi Kavita

सौ. विजेता चन्नेकर, लिखित मराठी कविता गानकोकिळा, लतादीदी

गानकोकिळा, लतादीदी Marathi Kavita

तू माधवाची बासरी,
तू शारदेची विणा
तू राग मल्हार... तूच भैरवी
तुझ्या यशापुढे तर शिश झुकवती
सदैव अभिमानाने चंद्र ,रवी
तुझ्या जादुई स्वरात ही वसुंधरा
अखंड नहावी.....
तू गीत गात जावे.. 
आणि तिने तृप्त तृप्त व्हावे

किती लाखो-करोडो मनात
सजवली  मैफिल.सुरांची...
आनंद, दुःख, उत्साह, वेदना,
किनार तुझ्या गीताला 
प्रत्येक भावनांची...

प्रत्यक्ष सरस्वतीच तुझ्या 
कंठात स्थित
मनापासून तिला स्मरूनी
गावे तू गीत
मंत्रमुग्ध व्हावा रसिकवर्ग ....
तुझे गीत ऐकता डोलावा तो स्वर्ग...  
हृदया विराजमान संगीत प्रेमींच्या हृदयी.

घडतात भारतभूवर  नेहमीच चमत्कार
म्हणूनच.. या अलौकिक तारकेने
घेतला इथे आकार...
संगीत जीवन तिचे.... सूर तिचा श्वास, 
मांडूनी  गीतांची आरास
घातली मोहिनी संपूर्ण विश्वास...
कित्येक रखरखत्या वाळवंटी जीवनात....
फुलवीला आनंदी सुवास..

आणि... आणि निघाली अखेरचा
दंडवत घेऊन
रसिकवर्गावर तुझं कायमच ऋण...
युगानुयुगे तुझ्या गीतांचा‌ मोरस्पर्श, 
भुरळ घालील मनावर...
तू तर सूरसम्राज्ञी, भारतरत्न, 
करू सप्तसूरांची आराधना तुलाच स्मरून
गानकोकिळा आमची तू
हृदय गाभारा तुझ्या आठवणीने गंधित....
आणि ओठावरही राहू  गुणगुणत तुझे गीत
दीदी... ही शब्दसुमने तुझ्या चरणी समर्पित..

vijaya-channekar-gondia

सौ. विजेता चन्नेकर,
भुमर, जि. गोंदिया