कोडं मराठी कविता - Marathi Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित आयुष्यातील कोडं चे वर्णन करणारी कविता कोडं ....

कोडं मराठी कविता - Marathi Kavita

कधी कधी आयुष्याचं कोडं
खूप कठीण होऊन बसतं
मन मला सतत सांगत राहतं
इथे कोणीच कुणाच नसतं

आयुष्याच्या या चक्रव्यूहात
नकळतपणे आपण अडकतो
विनाकारण आपला जीव 
कुणासाठी तरी तडफडतो

आपल्या जवळच्या माणसांना
आपली काहीच किंमत नसते
आयुष्य जगण्याची संकल्पना
नको नकोशी होऊन बसते

नात्यांचा हा खूप मोठा तिढा
सोडवताना दमछाक होते
विनाकारण तेव्हा आपल्याला
कोणीही काहीही बोलून जाते

प्रत्येकाला असच वाटतं
फक्त माझच खरं असावं
जीवनाच्या प्रवासात या
कोणीच सोबत नसावं

असं वाटतं तोडून सारे बंध
एक श्वास घ्यावा मोकळा
आयुष्याकडे पाहण्याचा
दृष्टिकोनच असतो निराळा

सारं काही सहन करत आपल्या
अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो
का? कोणास ठाऊक मग तेव्हा
आपण या जाळ्यात अडकतो

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे