पहिल्या दिवशी । पहिलाच मान ।
पुजापाठ छान । करतसे ।।१ ।।
रूप ते अनोखे । दुर्गेचे सुंदर ।
नयन विभोर । दिसतसे ।।२ ।।
प्रथमच दिनी । घट बसविला ।
दिवा तो लाविला । नवरात्री ।।३ ।।
त्रिशूल धरिला । उजव्याच हाती ।
उठूनी शोभती । शैलपुत्री ।।४ ।।
अर्ध चंद्र भाळी । कमळ हातात ।
काजळ नेत्रांत । शोभतसे ।।५ ।।
पूर्व जन्मी देवी । कन्या ती दक्षाची ।
पत्नी शंकराची । नाव सती।।६ ।।
भरते मी ओटी । खण नारळाची।
शांतता मनीची । लाभतसे ।। ७ ।।
पुनम बेडसे, धुळे