दिवस कसे किती सर सर सरले
जिंदगानी तशी कोरडीठाकच गेली ।।
पायपीटी करण्यात मन थकून गेले
हवे शोधण्यात जिंदगी हरून गेली ।।
आज उपास घडे आता उद्या कसे ?
भाकरीची भ्रांत ती ,ना कधी मिटली ।।
येई घरट्यात परत पाखरू थकेले
सांजवेळी घरचौकट तरी दिसली ।।
साजणी दारी पाहुनी डोळे निवाले
दिवसभराची फरफट विसावली ।।
उन्हाचे चटकेच ते सोसावे लागले
रात्र सारी चांदण्या मोजण्यात गेली ।।
अशा जिंदगीत पडली तिची पावले
हयात तिची जगणे शिवण्यात गेली ।।
तोडणे दूर ,खुप काही तिने जोडले
आधाराची सावली बनून ती जगली ।।
एका भणंग आयुष्याला तिने सावरले
सुखाची झुळूक बनून घरात वावरली ।।
अरुण वि.देशपांडे-पुणे