New Year 2022 नव्या वर्षाची.. नवी सुरुवात..

पूनम सुलाने लिखित मराठी कविता नव्या वर्षाची.. नवी सुरुवात.. 2022

New Year 2022 नव्या वर्षाची.. नवी सुरुवात..

फुटतील पंख नवे शब्दांना
नव्या विश्वासाने भरारी घेताना
परतूनी भेटतील स्वप्न नवे
नव्या विश्वात रंग भरताना

संपेल खेळ नियतीचा
नवा डाव पुन्हा मांडतांना
बळ नवे घेऊन येईल
क्षण आनंदाचा जीवनी येताना

खुलून येतील रंग सारे
रंग नवे जीवनात भरतांना
दरवळेल सुगंध चौफेर
हळुवार कळी उमलताना

जुळतील सुर पुन्हा नव्याने
गीत आनंदाचे गाताना
हिरवा साज नवा घेऊन येईल
पुन्हा श्रावण येताना

पानगळीच्या यातना विसरल्या जातील
नव्या फांदीला नवी पालवी फुटताना
नव्या वर्षाची नवी सुरुवात होईल
जुन्या शब्दांची जुनी आठवण विसरताना

Poonam Sulane

पुनम सुलाने
हैद्राबाद