गेले किती वर्ष,
गेले किती महिने
कधीच बंद नाही गं
अश्रू माझे वाहणे...
कधी गेला नाही
एकही दिवस असा
तुझा चेहरा वाटे मला
पोर्णिमेचा चंद्र जसा...
प्रत्येक सुखदुःखात
येते तुझी आठवण
राहिली मनात माझ्या
तुझ्या बोलण्याची साठवण
किती स्वप्न पाहिले
तू गं माझ्यासाठी...
पण ते राहिले
तुझ्याच गं ओठी...
गाय आणि वासरू
बघते जेव्हा अंगणात
तेव्हा तुझी खंत
वाटते माझ्या मनात...
किती कमी वाटते गं
तुझी सांगू शकत नाही
जगात तुझ्या इतकं प्रेमळ
दुसरे कोणीही नाही...
देवा तुझ्याकडे एकच मागणे
जगात रंग तरंग असुदे हजार
नको तिच्याविना वनवासी जगणे
आईविना जगणे असते देवाकडे उदार

सौ. कावेरी दिलीप पगार,
गोळवाडी, ता. वैजापूर
