चिंचेच्या झाडाला गं, लागल्या चिंचा फारं
जांभूळ, चिकू, केळं.. पिकली पेरू बोरं..
गोजिऱ्या रुपामंदी, इवलिशी गोड राणी
शोभते छान नारं, जणू नक्षत्रावाणी
लपतं छपतं, खेळते नटखट खारं..
जांभूळ, चिकू, केळं.. पिकली पेरू बोरं..
तगडी म्हैस, ओलांडीत वेस
ठुमकत आली चरायला..
सावळा चिमणराव, राखाडी मैनाबाई
पोपटी पोपट, रावा.. झाडावरी खारुताई
उडूनिया आकाशात पक्षी, धुंडाळती चहुफेर..
जांभूळ, चिकू, केळं.. पिकली पेरू बोरं..
हत्तीणी, हरिणी.. तांबडी चिमणी, मोरणी गं..
नाचतो थुईथुई मोरं, कोकिळेचं मंजूळ गाणं
आरोळी देता वाघ, जिवाचं झालं रानं
पांदीत सूर घुमतो, मारवा छेडितो तारं..
जांभूळ, चिकू, केळं.. पिकली पेरू बोरं..
सारिका टेकाळे.. ( डांगे चौक, पुणे )