आयुष्याची गाडी तिचं आहे
श्वास अडखळला तरी घेत आहे.
थकले जरी कितीही
जीवन झेलताना,
स्वप्न पाहू लागले
पुन्हा एकदा उमलताना.
धाव धाव धावतेय
दिशा मात्र कळत नाही,
हृदयाचे पाऊल कधी
हृदयाकडे वळत नाही .
एक क्षण यईल असा
घेऊन जाईल हा श्वास,
अर्ध्यावरच थांबलेला असेल
माझ जीवन प्रवास.
इतकं जगून झालं पण
जगायला स्वतःसाठी वेळ नाही,
जगते आहे कशासाठी
कसलाच ताळमेळ नाही.
स्वाती जाधव, लासूरगाव
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद