रक्ताची नाती आता परकी झाली
तुटले दोर आता आपलेपणाचे,
जिथे जुळती मनांची नाती
तिथेच ऊरतात धागे संवेदनांचे...
रक्त, रक्ताच्या कामी येईल
खरे नाही या थोतांडाचे,
व्यवहाराच्या कुबड्या नसतील
तिथेच फुलतात धागे संवेदनांचे...
मनामनांत आता वणवे पेटलेत
मनी भाव केवळ व्यवहारांचे,
निष्पाप जुळती मने जिथे
तिथेच उमलती धागे संवेदनांचे...
किती करावा आकांत पण
इथे भाव सारे स्वार्थीपणाचे,
आयुष्याच्या प्रवाहात जपावे
मनापासूनी धागे संवेदनांचे...
सौ. जया वि. घुगे-मुंडे,
परळी वैजनाथ, जि. बीड