जीवन जगताना सर्वात महत्त्वाची असते ती जबाबदारी. सर्वजणांना ती पार पाडावी लागते. मग त्यात कुणाला खूप संघर्ष करावा लागतो! लहान वयात पडलेली जबाबदारी माणसाचे आत्मचरित्र घडवत असते. संघर्ष माणसाला प्रखर बनवत असतो. गोष्ट अशीच एका आगळ्यावेगळया व्यक्तिमत्त्वाची माणुसकी शिकवणाऱ्या एका सामान्य माणसाची. अवघ्या आठव्या वर्षी गरिबीने पोखरून निघालेलं, एक धडाडी अंगात भरून . उसने अवसान आणून शिक्षणाची आवड असताना पैसा नाही आणि वेळ कमी या चारही बाजूंनी जखडलेलं गरिबाचं एक पोर कुटुंबावर आलेलं संकट मात्र मोठ! जगायचं आणि यांना जगवायचं एवढा एकच प्रश्न समोर उभा, ध्येयवेढे पोर निर्णय घेऊन मोकळे झाले आर्मी भरतीसाठी जायचं.
पूर्वीच्या काळी या गोष्टीला कुणी सहजासहजी तयार होत नसेल; पण पर्याय नसतो तिथं माणूस हतबल होतो खूप वर्षांनी आपत्य झालं वंश वाढला या खुशीत जगणारे लोक भावनेच्या भरात नको नको ते निर्णय घेतात आणि समोरच्याचा संघर्षमय प्रवास आणखीन अवघड करत असतात असंच काहीसं घडू लागलं त्या मुलाचे वडील मरण यावे म्हणून मडक्याने आंघोळ करू लागले. सुन्न करणारा हा प्रकार पाहून तो मुलगा किती घाव सोसत होता कोण जाणे. घट्ट करून सगळ्यांना समजावून सांगत हा प्रवासी मात्र थांबला नाही त्याचा आर्मी भरतीचा प्रवास सुरू झाला. परिस्थितीशी जुळवून घेत सगळ्यावर मात करत मनाशी गाठ बांधून निघाला
पूर्वी आर्मी भरती ची ट्रेनिंग ही नाशिक 'देवळाली'हे ठिकाण होते जायला पैसे नाही. घालायला कपडे नाही पैशाची जमवाजमव सुरू झाली आईचा हात डोक्यावर होता आईने गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची फुले विकण्यासाठी दिली. हे दृश्य किती भयानक असेल याची कल्पना करावी. आगीचा निखार्यावर चालत आहे असे भासत होते गरिबीने एवढं शिकवलं होतं त्याच दिवशी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही जीवनाची लढाई लढायला निघालेला तो माणूस देशाचा फौजी त्याच दिवशी झाला होता आणि जीवनाची ही लढाई लढाईची होती त्याला. थोड्याच दिवसात नोकरी लागली पगार मात्र साठ रुपये कसे भागणार होते कोण जाणे.
पण पूर्वी गर्जा मात्र सीमित असायच्या पाच रुपये स्वतःसाठी ठेवून 55 रुपये मनीऑर्डर करून रिकाम्या हाताने तो महिना कसा काढत असे कोण जाणे. कुटुंबासाठी जगायचं देशासाठी लढाईचं डोळ्यात स्वप्न हातात कष्ट मनाचा मोठा दिलखुश मिजाज माणूस कुणालाच कळत नसतो गरिबीने त्याला परोपकार करायला शिकवलं होतं. आपलं अस्तित्व मात्र विसरून जगत असतात हे लोक एवढं मात्र खरं. अवघे सातशे रुपये बहिणीच्या हुंड्यासाठी कमी पडले आणि हा मुलगा स्वतःला लग्नाच्या बाजारात उभा करू लागला; कारण तिथं असलेल्या काही लोकांनी सुचवलं होतं तुमचं पण लग्न करा आमच्याकडे तशी मुलगी आहे आम्ही तुम्हाला सातशे रुपये देऊ मान खाली घालून उभा असलेला हा मुलगा एका म्हाताऱ्या माणसाला भावला वाळवंटावर वेळ वाळवंटावर पाणी पडून जशी वेल फुलावी तशी त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मी लाभली दृष्ट लागण्याजोगा संसार थाटला.
जबाबदारीचा प्रवास एवढ्या लवकर संपत नसतो. संसाराचा भार धर्म पत्नीवर सोपवून तो परत जायला निघाला जवळजवळ दहा वर्ष हे पती-पत्नी वेगळे राहत होते कुटुंबाची काळजी घेत होते कालांतराने सर्व मार्गी लागले असताना यांना मुलं झाली त्यांची जबाबदारी ही होती त्यातच जो करतो त्याची परीक्षा देवही घेत असतो असंच काहीसं झालं पत्नीच्या कुटुंबाचा भार या व्यक्तीवर येऊन ठेपला मुलगी मुलगा आणि पत्नी यांचा हात जावयाच्या हातात देऊन सासरे मरण पावले काळाचा परत एकदा घाला झाला . सगळ्यांना सांभाळणारा जावई देव माणसासारखा लाभला ते धन्य झाले परंतु; जबाबदारीच्या ओझ्याखाली तो माणूस मात्र हरवला. कष्टाचा ओझ सर्वांसाठी वाहणारा हा निरपेक्ष वृत्ती, मनाचा मोठेपणा, खुश मिजाजी, परोपकार, सेवा या सगळ्यांनी संपूर्ण असलेला हा माणूस इमानदारीला कवठाळून जगला तो सच्चा देशभक्त त्याला सलाम ! त्याच्या कष्टाला सलाम! त्याच्या संघर्षाला सलाम! आणि त्याचा निस्सीम कुटुंब प्रेमाला सलाम! त्याच्यातल्या जबाबदारीला सलाम!????????
सौ ज्योती शिंदे
ता. चाकूर जि. लातुर